कन्या वन समृद्धी योजनेतंर्गत, निमगाव वाघात मुलगी झालेल्या शेतकरी दांम्पत्यांना फळझाडांचे वितरण


कन्या वन समृद्धी योजनेतंर्गत, निमगाव वाघात मुलगी झालेल्या शेतकरी दांम्पत्यांना फळझाडांचे वितरण

वन समृद्धी योजना प्रेरक व समाज, पर्यावरणात बदल घडविणारी -पै. नाना डोंगरे


अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- सामाजिक वनीकरण विभागाच्या कन्या वन समृद्धी योजनेतंर्गत निमगाव वाघा येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून मुलगी झालेल्या शेतकरी दांम्पत्यांना विनामुल्य प्रत्येकी दहा फळझाडांच्या रोपांचे वितरण करण्यात आले. गावातील नवनाथ माध्यमिक विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे व वनरक्षक अफ्सर पठाण यांच्या हस्ते लाभार्थींना रोपांचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन वाबळे, हरियालीचे सुरेश खामकर, नयन ठाणगे, गणेश डोके, मेघा डोके, गणेश येणारे, संतोष रोहोकले, लाभार्थी गणेश भुसारे, बाळासाहेब जाधव, दिनेश भुसारे, प्रमोद भुसारे, सचिन ठोकळ आदी उपस्थित होते.पै. नाना डोंगरे म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक वनीकरण विभागाची कन्या वन समृद्धी योजना प्रेरक ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून भावी पिढीसह नागरिकांमध्ये वृक्ष लागवड आणि संवर्धनबाबत आवड निर्माण होणार आहे. मुलींचा घटता जन्मदर वाढविण्यासाठी व मुलगा-मुलगी समान हा संदेश घेऊन सुरु करण्यात आलेली योजनेतून समाजात व पर्यावरणात बदल घडणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.  

वनरक्षक अफ्सर पठाण यांनी मुलगा आणि मुलगी समान असून, महिला सक्षमीकरण, सबलीकरणासाठी तसेच मुलींच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्याच्या प्रमुख उद्देशासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे. पावसाळ्यामध्ये सामाजिक वनीकरण रोपवाटिकेतून लाभार्थींना दहा फळझाडे विनामूल्य ग्रामपंचायतीमार्फत दिली जातात. लाभार्थींनी घराच्या अंगणात व बांधावर झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल साधला जाणार आहे. तर काही कालावधीनंतर शेतकर्‍यांना फळांचे उत्पन्न मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक किसन वाबळे यांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये वृक्षरोपण व संवर्धन काळाची गरज बनली असल्याचे स्पष्ट करुन त्याचे फायदे व महत्त्व विशद केले. सुरेश खामकर यांनी शेतकर्‍यांना दिलेली झाडे आपल्या मुलांप्रमाणे वाढविण्याचे आवाहन केले. या उपक्रमाचे सरपंच रुपाली जाधव व ग्रामसेवक गोवर्धन राठोड यांनी कौतुक करुन, जिल्हाधिकारी यांच्या आवहानाला प्रतिसाद देत एक व्यक्ती, एक झाड या संकल्पनेनुसार गावात वृक्षांची लागवड केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.सामाजिक वनीकरण विभागाच्या कन्या वन समृद्धी योजनेतंर्गत निमगाव वाघा येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून मुलगी झालेल्या शेतकरी दांम्पत्यांना विनामुल्य प्रत्येकी दहा फळझाडांच्या रोपांचे वितरण करताना डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे व वनरक्षक अफ्सर पठाण समवेत नवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन वाबळे, हरियालीचे सुरेश खामकर, नयन ठाणगे, गणेश डोके, मेघा डोके, गणेश येणारे, संतोष रोहोकले, लाभार्थी गणेश भुसारे, बाळासाहेब जाधव, दिनेश भुसारे, प्रमोद भुसारे, सचिन ठोकळ आदी.

 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News