मलठण येथे अवैध गुटखा विक्री करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात


मलठण येथे अवैध गुटखा विक्री करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

शिरूर | प्रतिनिधी ( अप्पासाहेब ढवळे )     शिरूर तालुक्यातील मलठण येथे किराणा मालाच्या दुकानाची व घराची झडती घेतली असता (अक्षरी-अडोतीस हजार सातसे वीस रूपये)38720/- रूपये किंमतीचा अवैध गुटखा साठा जवळ बाळगून विक्री करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाच्या जाळ्यात तर सदर अटक करण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासा साठी शिरूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट यांनी दिली.


      शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत फरारी आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदाराद्वारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकास माहिती मिळताच मलठण गावातील योगेश मनोहर दंडवते यास प्रतिबंधित करण्यात आलेला पान मसाला,सुगंधी तंबाखू व गुटका याची बेकायदेशीररित्या साठवण करून विक्री करत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्या ने मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने मलठण येथील योगेश मनोहर दंडवते याचे किराणा मालाचे दुकानाची व घराची झडती घेतली असता (अक्षरी-अडोतीस हजार सातसे वीस रूपये)38720/- रूपये किंमतीचा प्रतिबंधित करण्यात आलेला पान मसाला,सुगंधी तंबाखूची विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या साठवण केली असल्यामुळे योगेश मनोहर दंडवते याचे विरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे . कल अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे भा.द.वि कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

                          सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक श्री.डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट,पो.स.ई अमोल गोरे,पो.हवा.जनार्दन शेळके,पो.ना.राजू मोमीन, पो.ना.अजित भुजबळ,पो.ना.मंगेश थिगळे, पो.कॉ.दगडू विरकर यांनी केली असून सदर अटक करण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासा साठी शिरूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News