त्या "राजराणीस" सोडण्यास निघाले दक्ष


त्या "राजराणीस" सोडण्यास निघाले दक्ष

श्रीगोंदा, अंकुश तुपे प्रतिनिधी

दिड वर्षांपुर्वी या राजराणीस अशिक्षितपणाचा फायदा घेत तिच्या लेहेरगुंडी, जि.बलरामपुर, उत्तरप्रदेश येथुन एका ट्रक ड्रायव्हरने पळवुन नेले होते. मुंबई पर्यंत अतोनात अत्याचार तिच्यावर केले. विरोध केला तर भिंतीवर फेकले. यामध्ये तिच्या कमरेला, खांद्यावर व शरीरावर खुप जखमा झाल्या. तिने ते सगळे त्रास व यातना सोसल्या. त्यांच्या हातुन सुटुन पायी गावाकडे चालत जात होती. १३ दिवसांपुर्वी ती आम्हांला मांडवगण रोडवर आढळुन आली. तिची चौकशी करता अनेक गोष्टी समोर आल्या. यासंदर्भात डॉ.नितीन खामकर यांच्याशी फोनवर चर्चा करुन १०८ अॅम्बुलन्सने ग्रामीण रुग्णालय, श्रीगोंदा येथे उपचारासाठी आणले. डॉ.राजुळे व त्यांच्या टिमने तिच्या सर्व चाचण्या केल्या. ती अशक्त होती. चक्कर येत होती. म्हणुन तिला जेवण देऊन सलाईन लावण्यात आल्या.

    दररोज भेटायला दक्षचे दत्ताजी जगताप व कार्यकर्ते जात होते. ती तिच्या ८ वर्षाच्या मुलीस(सिमास) व नवरा गणेश यांच्याकडे जाण्याचा हट्ट धरायची. दक्षकडे तिकीटाचे पैसे नसल्याने ते गोळा होईपर्यंत तिला धीर देत होतो. याविषयी लोकमतचे बाळासाहेब काकडे व नितीन रोही यांच्याशी चर्चा झाली. दत्ताजी बोसताना म्हणाले, परवा तिने मला घट्ट मिठीच मारली. आणि "मुझे सिमा और गणेश के पास ले चलो भैय्या। मुझे यहां मन नही लगता। जल्दी ले चलो।" म्हणत रडु लागली. माझेही डोळे पाणावले. मग मात्र काहीही झाले तरी तातडीने तिला तिच्या घरी नेऊन सोडवायचेच हा निर्धार मनाशी केला. दक्ष नागरिक फाऊंडेशनच्या व इतर व्हाटसअप ग्रुपवर सदर घटना शेअर केली. पहाता पहाता अनेकांनी विविध प्रकारे मदत देण्याचे कबुल केले व दिली सुध्दा. हिरणावळे सरांनी तातडीने रेल्वेचे तिकीट करुन दिले. 

    जगताप पुढे म्हणाले आज सकाळी राजराणीस भेटलो तेव्हा ती माझ्यावर नारज होती. "मुझे आपसे बात नही करनी। आप झुठ बोलते हो। मेरी बेटीसे नही मिलवाते। खाली झुठ बोलते हो।" असे म्हणाली. तिला सांगितले की, आज सायंकाळी निघायचे आहे. असे म्हटल्यावर खुशीने गळ्यात पडली. खुप आनंदी झाली.

     दक्षचे काम खरे तर वंचित घटकांसाठीच मदत करण्याचे आहे. यानिमित्ताने पुन्हा संधी आज भेटली आहे याचा आम्हाला खुप आनंद होत आहे. यासाठी दक्षच्या टिमचे खुप सहकार्य लाभले.

     कोरोनाच्या काळात दक्ष नागरिक फाऊंडेशनच्या माध्यमातुन दिड वर्षापासुन नगर जिल्ह्यासह ७ जिल्ह्यात स्वखर्चाने जनजागृती करत आहेत. याकामाची दखल घेत अनेक पुरस्कार सुध्दा संस्थांनी दिले. प्रशासनास सुध्दा खुप मोठी या कामामुळे होत आहे. 

     शेवटी आज शनिवार दि.३ जुलै २०२१ रोजी दौंडवरुन निघालो. याकामी दिगंबर भदे यांनी स्वत:ची चारचाकी घेऊन आले व आम्हाला दौंड रेल्वे स्टेशनला सोडले.

    या सर्व कामात श्रीरंग साळवे, दिगंबर भदे, धनेश गुगळे, समीर पांढरकर, नारायण ढाकणे, सुहास कुलकर्णी, बाळासाहेब भोर सर, सोनल हिरणावळे सर, डॉ. खामकर, डॉ.राजुळे, बाळासाहेब काकडे, नितीन रोही, पारधी सिस्टर, इतर नर्स व सर्व स्टाफने खुप सहकार्य केले.

    राजराणीस सोडण्यास दक्ष नागरिक फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप व दक्षचे कार्यकर्ते नारायण ढाकणे सोबत येत आहेत. उत्तरप्रदेशातील गोराथाना येथील पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस अधिकार्यांच्या उपस्थितीमध्ये तिच्या नवर्याच्या व तिच्या घरी सुपुर्त करणार आहोत.

      एक वेगळा अनुभव यानिमित्ताने येत असुन याकामी ज्यांनी ज्यानी मदत केली त्यासर्वांचे दक्ष व श्रीगोंद्याच्यावतीने आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News