धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील - लहुजी शेवाळे.


धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील - लहुजी शेवाळे.

:- नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जय मल्हार  सेनेचे सर सेनापती लहूजी शेवाळे समवेत जिल्हाध्यक्ष प्रदीपराज भोंडे यांच्यासह जिल्ह्यातील आसाराम कर्डीले, चैतन्य रोडगे, शेषराव रोडगे, दत्तात्रय वीर, राजेंद्र शिंदे, संदिप पानसरे, शंकर भाकरे, अशोक काळे आदी.(छाया :- ऋषिकेश राऊत)

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत ) :- राज्य सरकारने धनगर समाजाला राज्य घटनेतील तरतुदीनुसार अनुसूचित जमातीचे आरक्षण न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा इशारा जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

राज्यातील धनगर समाज बांधवांना राज्यघटनेतील तरतुदीनुसार अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी येत्या ८ दिवसात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जय मल्हार सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करण्यास भाग पाडणार आहोत. अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली. 

या पत्रकार परिषदेस जय मल्हार सेनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रदीपराज भोंडे यांच्यासह जिल्ह्यातील आसाराम कर्डीले, चैतन्य रोडगे, शेषराव रोडगे, दत्तात्रय वीर, राजेंद्र शिंदे, संदिप पानसरे, शंकर भाकरे, अशोक काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलतांना लहुजी शेवाळे पुढे म्हणाले की, कोविड च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धनगर आरक्षणाची चळवळ थांबली होती. मात्र आता जय मल्हार सेनेच्या वतीने पुन्हा नव्या जोमाने ही चळवळ कार्यरत राहणार आहे. आणि धनगर आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. राज्य सरकारने लवकरात लवकर धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. असा इशारा लहुजी शेवाळे यांनी दिला.


आगामी काळात राज्यभर जय मल्हार सेनेची संमघटनात्मक बांधणी मोठ्या जोमाने करण्यात येणार असून येत्या रविवार पासून धनगर समाज तेथे जय मल्हार सेनेची शाखा अशी भूमिका जय मल्हार सेनेने घेतली आहे. एकट्या नगर जिल्ह्यात १ लाख ८७ हजार धनगर समाज बांधव आहेत. राज्यातही धनगर समाजाचे निर्णायक संख्या आहे. त्या दृष्टीने आगामी काळात जय मल्हार सेना आपली वाटचाल करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटी दरम्यान धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचे लेखी आश्वासन शिवसेनेने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिले होते. याची आठवण देखील करून देण्यात येणार आहे. राज्यातील धनगर समाजातील नेते स्वतःच्या वैयक्तिक राजकीय लाभासाठी धनगर समाजाचा वापर करतात. व लाभाचे पद मिळाले की धनगर आरक्षणाचा प्रश्न सोईस्करपणे विसरून जातात.अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News