शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेल्या प्रभू श्री रामलिंग महाराज मंदिर परिसरात चिंचेची शंभर झाडे लावण्यात आली. भारतीय स्टेट बँक शाखा शिरूर आणि श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

गजानन गावडे शिरूर प्रतिनिधी :

      श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे खजिनदार पोपटराव दसगुडे म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना ऑक्सिजनचे महत्त्व प्रकर्षाने कळले आहे. आता तरी प्रत्येकाने किमान पाच झाडे लावली पाहिजेत. या वेळी भारतीय स्टेट बँकेचे प्रबंधक सुनील निकम, क्षेत्र अधिकारी अमोल सांडभोर, अर्जुन नीलवर्ण, अनुराग डेरे, रामलिंग देवस्थानचे खजिनदार पोपटराव दसगुडे, देवस्थानचे ट्रस्टी वाल्मिकराव कुरुंदळे, नामदेव घावटे, बलदेवसिंग परदेशी, रावसाहेब घावटे पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News