शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पेट्रोल,डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात चुलीवर भाकरी भाजुन केंद्र सरकारचा निषेध करून आंदोलन करण्यात आले व शिरूरचे तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.


शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पेट्रोल,डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात चुलीवर भाकरी भाजुन केंद्र सरकारचा निषेध करून आंदोलन करण्यात आले व शिरूरचे तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

गजानन गावडे शिरूर प्रतिनिधी :

     शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गॅस टाकीला पुष्पहार घालून इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

         यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मुजफ्फरभाई कुरेशी,शिरुर तालुका यूवकचे अध्यक्ष सागरराजे निंबाळकर,राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्षा विद्याताई भुजबळ, राष्ट्रवादी युवतीच्या तालुकाध्यक्षा संगीताताई शेवाळे,,शिरुर तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष राजुद्दिन सय्यद,लिगल सेलचे शहर अध्यक्ष रविंद्र खांडरे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थीचे उपाध्यक्ष राहिल शेख, शहर महिला अध्यक्षा पल्लवीताई शहा,युवती शहर अध्यक्षा तदनिका कर्डिले,शिरुर शहर वरिष्ट उपाध्यक्ष कलिमभाई सय्यद,कार्याध्यक्ष हफिजभाई बागवान,युवकचे माजी अध्यक्ष अमोल चव्हाण,युवक उपाध्यक्ष प्रतिक काशीकर,सागर नरवडे,विशाल थिटे,मृणाल कर्डिले,ललिता पोळ आदि उपस्थित होते.

       कोरोनाच्या संकटामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे.पेट्रोल,डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीने नागरिक मेटाकुटीला आले असुन महिलांचे अर्थिक बजेट पुरते कोलमडले असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News