विक्री करण्याचे उद्देशाने गावठी कट्टे कब्जात बाळगणारे दोन आरोपी नगर - जामखेड रोडवरील टोलनाका येथून जेरबंद , अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


विक्री करण्याचे उद्देशाने गावठी कट्टे कब्जात बाळगणारे दोन आरोपी नगर - जामखेड रोडवरील टोलनाका येथून जेरबंद , अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - नगर जामखेड रोड वरील टोल नाका येथे विक्री करण्याचे उद्देशाने गावठी कट्टे कब्जात बाळगणारे दोन आरोपी नगर - जामखेड रोडवरील टोलनाका येथून जेरबंद , अहमदनगर स्थानिक गुन्हे  शाखेच्या पथकाची कारवाई

  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके अहमदनगर यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि , अहमदनगर - जामखेड रोड वरील बंद असलेल्या टोल नाक्याजवळ दोन इसम हे गावटी कट्टे विक्री करण्यासाठी येणार आहेत , लागलीच गेल्यास मिळून येतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी स्थानि गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदे दिले . त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक   सोमनाथ दिवटे , पोसई / गणेश इंगळे , सफी / सोन्याबापु नानेकर , पोहेकॉ / भाऊसाहेब काळे , विजयकुमार वेठेकर , संदीप घोडके , पोना / शंकर चौधरी , ज्ञानेश्वर शिंदे , लक्ष्मण खोकले , रवि सोनटक्के , दिपक शिंदे , पोकॉ / राहूल सोळंके अशांनी मिळून दोन पंचासह खाजगी वाहनाने स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयातून निघून नगर - जामखेड रोडवरील टाकळी काझी शिवारातील बंद असलेला टोलनाका या ठिकाणी जावून सापळा लावला . त्यावेळी टोल नाक्याचे बाजूस असलेल्या एक बंद इमारतीचे पाटीमागील बाजूस दोन इसम संशईतरित्या आजूबाजूस टेहळणो करीत उभे असलेले दिसले . पोलीस पथकाची खात्री झाल्याने त्यांना घेराव घालून ताब्यात घेवून त्यांना पोलीस स्टाफ व पंचाची ओळख सांगून त्यांना त्यांची नावे पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे पत्ते १ ) संदीप पोपट गायकवाड , वय- ४० वर्षे , रा . जाबूत , ता . शिरुर , जि . पुणे , ह . रा . वाघोली , रायसोनी कॉलेज समोर , डोमखेल रोड , पुणे , २ ) भारत भगवा हतागळे , वय- २५ वर्षे , रा . गोविंदवाडी , तलवाडा , ता . गेवराई , जि . बीड असे असल्याचे सांगीतले . त्यांना त्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये दोन गावठी बनावटी कट्टे , दोन जिवंत काडतूसे व दोन मोबाईल असा एकूण ८०,६०० / -रु . किं . चा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आलेला आहे . वरील नमुद दोन्ही इसम नामे १ ) संदीप पोपट गायकवाड , वय- ४० वर्षे , रा . जांबूत , ता . शिरुर , जि . पुणे . ह.रा. वाघोली , रायसोनी कॉलेज समोर , डोमखेल रोड , पुणे , २ ) भारत भगवान हतागळे , वय- २५ वर्षे , रा . तलवाडा , ता . गेवराई , जि . बीड हे दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतूसे विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोकॉ / २२४ राहूल भाऊसाहेब सोळंके , नेम- स्थानिक गुन्हे शाखा , अ.नगर यांनी नगर तालुका पो.स्टे . येथे दिलेल्या फिर्यादीवरुन आर्म अॅक्ट कलम ३/२५ , ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही नगर तालूका पो.स्टे . करीत आहेत . सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभ कुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर व श्री . अजित पाटील साहेब , उपविभागीय पोलीस अधीकारी , नगर ग्रामिण विभाग , अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल

जाहिरात
Search
विडिओ
Recent News