शेवगावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती आवारात बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याची मागणी


शेवगावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती आवारात बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याची मागणी

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

स्थानिक टपरीधारकांनी केले अहमदनगर येथे जिल्हा परिषदेसमोर केले प्राणांतिक उपोषण 

कार्यकारी अभियंता जि.प सा.बा दक्षिण विभाग यांनी दिले जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांना लेखी पत्र 

            शेवगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुलांची), प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती आवारात जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे यांनी सादर केलेल्या 2017 च्या प्रस्तावानुसार बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याच्या मागणीचे निवेदन स्थानिक टपरीधारकांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्या व शेवगाव च्या जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे, यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा परिषदेसमोर प्राणांतिक उपोषण करण्यात आले होते 

      जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांची मागणी होती की शेवगाव येथील जि.प. शाळा मुलांची येथे शॉपिंग कॉम्लेक्स ( बी.ओ.डी ) सत्वावर बांधण्याबाबत 

मौजे शेवगाव येथील जि प प्राथमिक शाळेची सिस नंबर 16 29 ही जागा बांधा वापरा हस्तांतरित करा बीओटी तत्वावर विकसित करणे रा सर्वसाधारण सभेत प्राथमिक मान्यता दिलेली आहे त्यानुसार सादर प्रस्तावाबाबत ची कारवाई चालू आहे आपण 14 6 2019 रोजी अहमदनगर यांना दिलेले नियोजनातील विषय मंजूर करण्याचे अधिकार जि प सर्वसाधारण सभेचे आहेत याबाबत जि प सर्वसाधारण सभा जो निर्णय घेईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल तरी आपण व आपले सहकारी यांनी आज दिनांक 1 /7/2021 रोजी चे उपोषण कृपया स्थगित करावे असे  कार्यकारी अभियंता जि प आबा दक्षिण विभाग अहमदनगर यांनी असे लेखी पत्र दिले आहे .

उपोषण तात्पुरते स्थगित विहित करण्यात आले आहे 

यावेळी जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे, शेवगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विनोद मोहिते, जनशक्ती विकास आघाडीचे शहराध्यक्ष सुनिल काकडे, संजय गुजर, अरविंद पटेल, विष्णू पाठे, रोहिदास गांगे, किशोर गरडवाल, कादर मनियार, सिराज शेख, संदिप राऊत, मोहंमद रफिक तांबोळी, बबलू तांबोळी, राजू वाकळे, भाऊसाहेब भाग्यवंत, रणजित शेळके, राधेश्याम मुंदडा, ज्ञानदेव सोनवणे, मधुकर वणवे, बबन घुगे, प्रल्हाद कांबळे आदिंसह टपरीधारक उपस्थित होते.  

शेवगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुलांची) ही सन 1857 रोजी स्थापन करण्यात आलेली असून, त्यालगत चारही बाजूने टपरीधारक विविध व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. सदरील सर्व टपरीधारकांकडून अधिकृतरित्या नगरपरिषदला कर पावतीचा प्रतिदिन भरणा केला जात आहे. सदरील शाळेसह प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती आवारात बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे यांनी जिल्हा परिषदेला सादर केला होता. यानंतर तो प्रस्ताव बाजूला ठेवण्यात आला. 14 जून 2021 रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुलांची), जिल्हा परिषद शाळा उर्दु, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र पैठण रोड आदी सर्व ठिकाणच्या जागा 99 वर्षाच्या करारावर देण्याची मागणी अधिकारी व पदाधिकार्‍यांमधून झाली. या निर्णयाने धनदांडग्यांचा फायदा होऊन सर्वसामान्य टपरीधारकांचे नुकसान होणार असल्याने हर्षदा काकडे यांनी या मागणीला विरोध दर्शविला. सदरील प्रस्तावास सर्व टपरी धारकांचा देखील विरोध असून, याबाबत जिल्हा परिषदेला देण्यात आलेल्या 2017 च्या प्रस्तावाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नसून, 99 वर्षाच्या करारावर मंजुरी देणे म्हणजे टपरीधारकांची रोजंदारी बंद करून उपासमारीची वेळ येणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले

शेवगाव जिल्हा परिषद (मराठी) शाळेच्या जागेवर सुमारे 40 ते 50 वर्षापासून टपरीधारक विविध व्यवसाय करुन कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवित आहे. सदर जागेत बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधल्यास टपरीधारकांना प्राधान्याने गाळे देऊन उर्वरीत गाळ्यांचा लिलाव होऊ शकतो. यामुळे राजकीय पुढारी, बांधकाम व्यावसायिक व धनदांडगे यांचा हस्तक्षेप होणार नाही. तर सर्वसामान्यांचा यामध्ये फायदा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सदर गाळ्यांना 99 वर्षाच्या करारावर मंजुरी देण्याच्या निर्णयाचा निषेध करुन सदरील प्रस्ताव तात्काळ रद्द करून त्या ठिकाणी 2017 प्रस्तावानुसार बीओटी तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधावा, टपरीधारकांना प्राधान्याने गाळे देऊन उर्वरीत गाळ्यांचा लिलाव करण्याची अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी प्राणांतिक उपोषण यावेळी केली

जाहिरात
Search
विडिओ
Recent News