लोणी पाटी येथे ओबीसी समाजाची रविवारी होणार महत्त्वपूर्ण बैठक


लोणी पाटी येथे ओबीसी समाजाची रविवारी होणार महत्त्वपूर्ण बैठक

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्यामुळे ओबीसी समाजामध्ये नाराजीचे वातावरण आहे, त्यामुळे ओबीसी समाजातील सर्व घटकातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक गंगोत्री मंगल कार्यालय लोणी पाटी येथे रविवार दि. ४ जुलै रोजी सकाळी ११ वा.आयोजित करण्यात आली आहे. 

ओबीसी समाजातील कार्यकर्ते, ओबीसी मंडळे, संस्था आपण सर्व एकत्रीत येऊन ओबीसी समाजाला हे आरक्षण कसे पुर्ववत करता येईल यासाठी व पुढील आंदोलनाबाबत विचारविनिमय व पुढील दिशा ठरवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे.

या बैठकीसाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे. ओबीसी समाजाची एकजुट व ताकद दाखवण्यासाठी व आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येण्याचे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे जिल्हा, अहिल्या-सावित्री सामाजिक संघटना, मल्हार आर्मी महाराष्ट्र राज्य, बारा बलुतेदार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनांनी केले आहे.

      समता परिषदेचे  अनिल लडकत, अहिल्या सावित्री सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा डॉ.अर्चना पाटील, मल्हार आर्मीचे सचिव गणपतराव देवकाते, ज्योती झुरंगे, यशवंत चॅरिटेबल फाऊंडेशनचे अध्यक्ष संपतराव टकले, बापुराव सोलनकर यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News