लाटे येथे कृषि दिन साजरा


लाटे येथे कृषि दिन साजरा

बारामती :प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने 21 जुन 2021 ते 1 जुलै 2021 या कालावधीमध्ये कृषि संजीवनी मोहीम राबविण्यात आली. या मोहीमे अंतर्गत प्रत्येक दिवशी एका विषयावर संपुर्ण राज्यात शेतक-यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण , शिवारफेरी, प्रात्यक्षीके याच्या माध्यमातून कृषि तंत्रज्ञान पोहचविण्यात आले. या मोहीमेची सांगता कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती दिवशी कृषि दिन साजरा करून करण्यात आली.  बारामती तालुक्यातील लाटे येथे मंडळ कृषि अधिकारी वडगांव निंबाळकर या मंडळाच्या मोहीमेचा सांगता समारंभ कृषि दिन साजरा करून झाला. 

   लाटे परिसरामध्ये सोयाबीन या पिकाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता, आघारकर संशोधन संस्थेचे सोयाबीन पिक तंत्र अधिकारी श्री.भानुदास इधोळ सर यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यातआले होते. या वेळी त्यांनी सोयाबीन पिकासाठी लागणारे हवामान, जमिन, पिकांचे वाण, बीजप्रक्रिया, सोयाबीनसाठी खतांच्या शिफारशी, किड व रोग यांचे नियंत्रण, सोयाबीन साठवणुक तसेच घरचे बियाणे तयार करण्यासाठी सोयाबीन काढणीचे तंत्र या विषयावार सखोल मार्गदर्शन केले. मंडळ कृषि अधिकारी दिपक गरगडे यांनी कृषि विभागाच्या विविध योजना, महाडीबीटी, मग्रारोहयो फळबाग लागवड, नाडेप, गांडुळ खत युनिट, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना इत्यादी योजनांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी लाटे गावच्या सरंपच सौ. शितल खलाटे, उपसरपंच सौ. उषा खोमणे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन खलाटे, माजी संचालक नानासो खलाटे, दुध संघाचे माजी संचालक प्रशांत खलाटे, ग्रामसेवक विजय चव्हाण, अशोक नारायण खलाटे, गणपत खलाटे, हनुमंत साबळे व इतर प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. यावेळी नानासो खलाटे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास कृषि सहाय्यक राहूल भोसले यांनी विशेष परीश्रम घेतले, तसेच कृषि सहाय्यक शरद सावंत, प्रविण गायकवाड व प्रियांका मदने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि पर्यवेक्षक चंद्रशेखर जगताप यांनी केले, तर आभार कृषि पर्यवेक्षक प्रविण माने यांनी मानले. या कार्यक्रमानंतर सोयबीन पिकाची शिवार फेरी करण्यात आली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News