जुन्या वादातून देऊळगाव गाडा येथे वीटभट्टी कामगाराला गंभीर मारहाण आरोपी अटक


जुन्या वादातून देऊळगाव गाडा येथे वीटभट्टी कामगाराला गंभीर मारहाण आरोपी अटक

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

- दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथे दोन वीटभट्टी मालकांच्या जुन्या वादातून परप्रांतीय कामगाराला पळवून नेऊन मारहाण केल्याचा गुन्हा यवत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी दिली आहे, यातील हकीकत अशी की  फिर्यादी सोमनाथ विक्रम  शिंदे रा देऊळगाव गाडा यांचेकडे गोविंद सुकलाल राहणार नेपानगर,जिल्हा बुरणपूर मध्यप्रदेश सध्या राहणार देऊळगाव गाडा हा वीटभट्टी वर कामगार म्हणून काम करीत होता,सोमनाथ शिंदे आणि अंकुश वसंत  शिंदे वय 27 रा देऊळगाव गाडा या दोघांमध्ये व्यवसायीक वाद होता त्या वादातून अंकुश शिंदे याने सोमनाथ शिंदे यांच्याकडील कामगार गोविंद सुकलाल याला वीटभट्टी वरून घेऊन देऊळगाव गाडा हद्दीत बेटपाटी जवळ मोकळ्या मैदानात पिचवर गोविंद सुकलाल रा नेपानागर, जि बुराणपुर मध्य प्रदेश याला दगड व काठी ने मारहाण केली,  यातील आरोपी अंकुश शिंदे याने गोविद सुखलाल यास त्याच्या दुचाकी वर जबरदस्तीने बसवून घेऊन जाऊन फिर्यादी च्या जुन्या वादाचे कारणावरून डोक्यात व तोंडावर काठी व दगडाने जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याने गुन्हा रजिस्टर नंबर575/21 भा द वि कलम 307,367,324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अटक करण्यात आला आहे,  ही दि 29/06/2021 रोजी रात्री 8.30 वाजता घटना घडली आहे अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी दिली, पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय नागरगोजे पो उपनिरीक्षक यवत हे करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News