घोडेगाव येथील शासकीय धान्य गोडाऊन येथे वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न.


घोडेगाव येथील शासकीय धान्य गोडाऊन येथे वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न.

विलास काळे, घोडेगाव प्रतिनिधी

      शासकीय धान्य गोदाम (घोडेगाव ) आंबेगाव  या ठिकाणी आज  मा. महसूल विभाग आंबेगाव तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांच्या उपस्थित शासकीय धान्य गोदाम घोडेगाव येथे वृक्षरोपण करण्यात आले

   आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणी आंबेगाव तालुक्यात लागणारे रेशनिंग शासकीय धान्य गोदाम असून या गोदामाच्या परिसरात आंबेगाव तालुका निवासी नायब तहसीलदार आंबेगाव श्री अनंत गवारी साहेब तसेच संजय गांधी योजना नायब तहसिलदार श्री.असवले साहेब व महसूल नायब तहसीलदार श्रीमती लतादेवी वाजे तसेच पुरवठा निरीक्षक सुनील गायकवाड,अनिल पाटील तसेच गोदाम पालक विलास बोऱ्हाडे यांच्या हस्ते आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी या कार्यक्रमासाठी श्री सुरेश घोलप अध्यक्ष आंबेगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना व आनंद काळे,राजू देवडे,लहू बोऱ्हाडे,स्वप्नील बोऱ्हाडे,व इतर स्वस्त धान्य दुकानदार तसेच हमाल संघटनेचे मुकादम दत्तात्रय पातकर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News