भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वाढत्या महागाई विरोधी जन आंदोलन


भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वाढत्या महागाई विरोधी जन आंदोलन

सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळुन व निदर्शने करण्यात आली

शेवगांव‌ प्रतिनिधी सज्जाद पठाण : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महागाईच्या विरोधात तसेच मोदी सरकार महागाई रोखण्यासाठी अपयशी ठरल्याबददल व महागाई कमी व्हावी म्हणून आंदोलन सुरु आहे. आज शेवगाव मध्ये क्रांती चौकात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात महागाईचा पुतळा जाळून आंदोलन करण्यात आले,जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत.तेल,डाळी,अन्य धान्य व इतर जीवनावश्यक वस्तु खरेदी करणे गोरगरीब जनतेच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत,पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या,व अबकारी करात कपात करुन त्याचा लाभ जनतेला द्या,गँस सिलेंडर च्या किंमती कमी करून त्यावरील सबसिडी पुन्हा सुरु करा,गरीबांची चेष्टा आणी फसवणूक करणारी उज्वला गँस योजनेच्या लाभार्थ्यांना व इतर जनतेला रॉकेल मुक्तीच्या नावाखाली बंद केलेला केरोसीन पुरवठा पुन्हा सुरु करा,रेशन दुकानातुन जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा मुबलक प्रमाणात करा,प्रत्येक कुटुंबाला १० हजार रपयाची आर्थिक मदत करा,आभासी पँकेज नको,खते बि बियाणे क्रुषी निविष्ठा जी.एस.टीमुक्त करून शेतकर्यांना मदत करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या,तरी वरील मागण्यांबाबत तहसिल अधीकारी व पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काॅ.सुभाष लांडे,काॅ.संजय नांगरे,काॅ.बापुराव राशीनकर,काॅ.राम पोटफोडे,काॅ.आत्माराम देवढे,काॅ.भगवान गायकवाड,काॅ.सय्यद बाबुलाल,काॅ.क्रांती मगर,अजहर पिंजारी,रविंद्र लांडे,अमोल तुजारे,काॅ.सुरेश मगर,जय मगर ,दिपक गारोळेआदिसह मोठ्या संख्येने नागरीक ऊपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News