शेवगाव तालुक्यातील विविध खाजगी शाळा फि वसुलीसाठी पालकांना तगादा करत असून पालकांची पिळवणूक तातडीने थांबवावी या करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार अर्चना भाकड पागिरे यांना निवेदन देऊन आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे.


शेवगाव तालुक्यातील विविध खाजगी शाळा फि वसुलीसाठी पालकांना तगादा करत असून पालकांची पिळवणूक तातडीने थांबवावी या करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार अर्चना भाकड पागिरे यांना निवेदन देऊन आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे.

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण :

गेल्या एक वर्षापासून कोरोना आजाराच्या महामारीमुळे सर्वच शाळा ह्या पूर्णतः बंद आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा शाळांनी जो घाट घातला आहे त्याद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण तर हे मुळात भेटतच नाही परंतु त्याद्वारे पालकांचे आर्थिक खच्चीकरण होत आहे, आपण स्वतः जाणतात की ह्या परिस्थितीत कित्तेक लोकांचा रोजगार हा हिरावल्या गेला आहे अनेकांचे अजून पगार वेळेवर होत नाही तरी शाळा ह्या विद्यार्थ्यांवर व पालकांवर संपूर्ण शैक्षणिक वर्षाची फी भरण्यासाठी तगादा लावत आहेत. जे पालक फी भरण्यासाठी असमर्थ आहेत त्यांच्या पाल्ल्याला शाळा ह्या ऑनलाईन वर्गात सहभागी न करून घेता आडमुठे पणाचे धोरण राबवत आहेत शिक्षण हक्क कायद्यानुसार, कोणत्याही बालकाला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. आठवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे. कोणताही बालक शाळाबाह्य राहता कामा नये.

या आधारावर पालकांनी फी वाढीचा विरोध केला किंवा फी भरली नाही तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण शाळांना थांबवता येत नाही असंही शिक्षण विभागाने यापूर्वी स्पष्ट केलं आहे,ह्या  शासन आदेशाला खासगी शाळा प्रशासनाने केराची टोपली दाखवून अगदी निरंकुश संस्थेसारखा कारभार चालवत आहेत.

बारा महिने म्हणजेच एक अख्खं शैक्षणिक वर्ष उलटून गेलं तरी आजही राज्यातील शाळा बंद आहेत.

शाळा बंद असल्याने शाळेतील विविध विषयांच्या प्रयोगशाळा, संगणकाचे प्रशिक्षण, विविध उपक्रम, शाळेचे मैदान, ग्रंथालय अशा वैविध्यपूर्ण शिक्षणांपासून विद्यार्थी वर्ग सध्या वंचित आहे. पण तरीही पालकांकडून दरवर्षीप्रमाणे पूर्ण फी मागितली जात आहे.

मुलांना घरी बसून दर्जेदार शिक्षण घेता येत नाहीय आणि शाळांनाही वीज बिल, मनुष्यबळ असा सर्व खर्च सध्या करावा लागत नाहीय तरीही पालकांनी शाळांची हजारो रुपयांची पूर्ण फी का भरायची? 

     शालेय संस्थांना सुद्धा काहीना काही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल शिक्षकांचे पगार इमारत देखभाल इतर तत्सम खर्च हे आम्हीही जाणतो परंतु सरसकट फी अश्या परिस्थितीत मागणे हे संपूर्णतः गैर आहे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण  सेना शेवगाव आपल्या कडे ही मागणी करत आहे की वार्षिक शैक्षणिक शुल्क (विविध उपक्रम वगळून) त्यात ४०% सवलत देऊन सध्याच्या आर्थिक परिस्थिती मुळे झुकलेल्या पालकांना व खेळण्याच्या वयात घरात डांबून ठेवलेल्या मुलांना ह्यात आपण तातडीने सवलत द्यावी व कोणती फी वाढ करू नये तसेच फि बाबत अडवणूक न करता सर्वाना सरसकट शिक्षण द्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.यावेळी उपजिल्हा अध्यक्ष गोकुळ भागवत,गणेश डोमकावळे, सोमनाथ आधाट,देविदास हुशार, ज्ञानेश्वर कुसळकर,निवृत्ती आधाट,कृष्णा दारकुंडे, संतोष शित्रे,सागर आधाट,सुनिल काथवटे,सचिन डाके,सुरज गोरे, अमिन सय्यद,बाळा वाघ,संजय वणवे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News