मदनवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र सर्जेराव देवकाते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


मदनवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र सर्जेराव देवकाते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

भिगवण प्रतिनिधी नानासाहेब मारकड: मदनवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी सरपंच आम्रपाली बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपसरपंच तेजस देवकाते यांनी आपला कालावधी पूर्ण झालेनंतर राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. नामनिर्देशन फॉर्म दाखल करण्याच्या वेळेत राजेंद्र सर्जेराव देवकाते यांचे एकमेव नामनिर्देशन प्राप्त झालेने निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. गाताडे यांनी राजेंद्र देवकाते  उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

यावेळी सरपंच आम्रपाली बंडगर तेजस देवकाते सुदर्शना थोरात राजश्री बंडगर अर्चना वनवे रत्नमाला नरुटे लक्ष्मी ढवळे सोमनाथ गुरगुळे शिवाजी देवकाते रणजीत निकम आदी सदस्य उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच राजेंद्र देवकाते म्हणाले की,मदनवाडी गावातील सर्वागीण विकासासाठी आपण कटीबद्ध राहणार आहे. यावेळी ग्रामस्थांनी  गुलाल उधळून आनंद व्यक्त केला

जाहिरात
Search
विडिओ
Recent News