भिगवण : नागेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी - संपत बंडगर


भिगवण : नागेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी - संपत बंडगर

भिगवण ( प्रतिनिधी) नानासाहेब मारकड 

रोटरी क्लब ऑफ भिगवण व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने नागेश्वर विद्यालय शेटफळगढे येथे विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून आर ओ वॉटर फिल्टर बसविण्यात आला, अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष संपत बंडगर यांनी दिली.

 शेटफळगढे येथील विद्यालयामध्ये 700 ते 800 विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी शाळेत वॉटर फिल्टरची व्यवस्था नसल्याने मिळत नव्हते त्याना बोरिंगचे पाणी प्यावे लागत होते, त्यामुळे मुले आजारी पडण्याचे प्रमाण अधिक होते याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होत होता अशी माहिती मुख्याध्यापक यांनी दिली.

 या कार्यक्रमासाठी रोटरीचे अध्यक्ष संपत बंडगर,नियोजित अध्यक्ष संजय खाडे,संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत,असिस्टंट गव्हर्नर रियाज शेख, डॉ.अमोल खानावरे,अकबर तांबोळी, नामदेव कुदळे,औदुंबर हुलगे, संतोष सवाने उपस्थित होते. 

   या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक व्हि डी जगदाळे,स्थानिक स्कूल कमिटी सदस्य मानसिंग वाबळे,ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ सवाणे,पुणे जिल्हा चिटणीस कामगार आघाडी भाजप रोहित बागडे व इतर शिक्षकांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News