सरपंचांचा पुढाकाराने खांमगाव गावचा पाणीपुरवठा सुरळीत.


सरपंचांचा पुढाकाराने खांमगाव  गावचा पाणीपुरवठा सुरळीत.

यवत, प्रतिनीधी.

खांमगाव ग्रामपंचायतीचा  थकीत विजबिलामुळे महावितरणने पाणी पुरवठ्याचा विज पुरवठा खंडीत केला होता. खांमगाव ग्रामपंचायतीमध्ये मोठ्याप्रमाणात वाड्यावस्यावरील नागरीकांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत  होता. यामुळे

खांमगाव ग्रामपंचायतीचा थकीत बिलासंदर्भात वैशाली नागवडे व सरपंच योगेश मदने यांनी  महावितरण चा  अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढला. व एकोणनव्वद हजार नवशे अडतीस रु महावितरण कडे सुपुर्द करुन सुरळीत चालू केलाय यावेळी वैशाली नागवडे,पं.स माजी उपसभापती सुशांत दरेकर सरपंच योगेश मदने, जयश्री खेडेकर, गोपीनाथ टिळेकर,शैलेश नागवडे, शैलेश कांबळे, दत्तोबा तांबे, सुरज खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


थकीत विजबिलामुळे महावितरणने तीन  दिवसा पूर्वी  तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा व पथदिव्यांची विज कनेक्शन महावितरणने तोडले होते. याच कारणामुळे देखील खांमगाव ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठ्याचे देखील कनेक्शन तोडले होते. या कारणामुळे वैशाली नागवडे, पंचायत समिती मा उपसभापती सुशांत दरेकर व सरपंच योगेश मदने यांनी मार्ग काढुन ८९९३८रु चा धनादेश महाविरण ला सुपुर्द करुन पाणीपुरवठा सुरळीत केलाय. 

सरपंच योगेश मदने यांनी सांगितले की मागचा काळात  अव्वाचे सव्वा पाणीपुरवठा ग्रामपंचातीकडुन थकीत आहे. आता चार महिने सरपंच झालो आहे. आम्ही पाच महीन्याचे विज बिल भरुन पाणी पुरवठा सुरळीत करुन घेतला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News