घोडेगाव येथिल कुंदन भाऊ काळे व त्यांचा मित्र परिवार समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेला पाहायला मिळत आहे. त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला.


घोडेगाव येथिल कुंदन भाऊ काळे व त्यांचा मित्र परिवार समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेला पाहायला मिळत आहे. त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला.

विलास काळे घोडेगाव प्रतिनिधी :

 बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर येथे कोरोणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बांधवांना भर पावसाळ्यातही चोख बंदोबस्त ठेवावा लागत असल्याने पावसापासून स्वतःची सुरक्षा करण्यासाठी रेनकोटची आवश्यकता भासत होती. हे पावसाळी क्षेत्र असल्याने पोलिस बांधवांना भर पावसात उभे राहून कर्तव्य निभवावे लागत आहे.श्री भीमाशंकर मंदिर कोरोना मुळे बंद असल्याने तसेच भाविकांना तसेच पर्यटकांना या भागात येण्यास बंदी असूनही काही हौसी पर्यटक भीमाशंकर परिसरात येत असतात त्यामुळे येथे घोडेगाव पोलीस स्टेशन मार्फत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून भर पावसात बंदोबस्तकरिता असलेले कर्मचारी आपले काम बजावत असतात त्यातूनच कुंदन भाऊ काळे व त्यांच्या मित्रपरिवाराने पोलीस बांधवांप्रती सहानुभूतीतून त्यांचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी रेनकोटचे वाटप केले आहे.

    यावेळी घोडेगाव येथील कपिल काळे, उल्हास काळे, विनायक काळे, सिद्धेश काळे, अक्षय मुळुक,  वैभव काळे उपस्थित होते. यावेळी पोलिस हवालदार कायगुडे व त्यांच्या साथीदारांनी कृतज्ञता व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News