मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता अभियान राबवून गायनाचा कार्यक्रम


मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता अभियान राबवून गायनाचा कार्यक्रम

जुन्या कौन्सिल हॉलला लवकरच नवसंजीवनी मिळेल -सभापती अविनाश घुले

   अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - मनपाचा कौन्सिल हॉल ऐतिहासिक असाच आहे. परंतु आगीत भस्मसात झाल्यापासून त्याकडे दुर्लक्ष होत गेले. आता या हॉलच्या जिर्णोद्धारसाठी विविध क्षेत्रातील कलाकार घेत असलेला पुढाकार कौतुकास्पद असून, आपणही मनपाच्या माध्यमातून तसेच नियोजन समितीच्या माध्यमातून या हॉलच्या जिर्णोद्धारासाठी विशेष निधीची मागणी करणार आहोत. त्याचच एक भाग म्हणून मनपाच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व इतिहासप्रेमी, साहित्यीक, कला, क्रीडा क्षेत्रातील सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले. त्यामुळे पुढील काळात या हॉलचा जिर्णोद्धार होऊन नवसंजीवनी मिळेल. सर्वांच्या सहकार्याने हा प्रश्‍न नक्कीच मार्गी लागेल, असे प्रतिपादन मनपा स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी केले.मनपाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील इतिहासप्रेमी व सामाजिक संस्था यांनी जुन्या मनपातील कौन्सिल हॉलमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी स्थायी समिती सभापती अविनाश घुले, इतिहास तज्ञ भुषण देशमुख, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, पंकज मेहेर, शिल्पकार प्रमोद कांबळे, गायक पवन नाईक, अमोल बासकर, भरत बागरेजा, बालाजी वल्लाळ, सतीश गुगळे, अंबादास गाजुल, योगेश हराळे, संजय कुलकर्णी, संतोष दाणे, संजय दळवी, अमर अग्रवाल, श्रेयश शित्रे आदि उपस्थित होते.


     याप्रसंगी रफिक मुन्शी म्हणाले, मनपाचा कौन्सिल हॉल अनेक नव्या-जुन्या कलाकारांसाठी यशाचे व्यासपीठ ठरले आहे. या हॉलमध्ये पूर्वी अनेक दिग्गजांच्या मैफिली, समारंभ, व्याख्याने आदिंसह इतर अनेक कार्यक्रम पार पडलेले आहेत. या हॉलचे पुनर्जिवन व्हावे, यासाठी मनपा सभापती अविनाश घुले यांनी या हॉलची पाहणी करुन जिर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांना कलाकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवर सहकार्य करतील. त्यासाठी कलाकारांच्यावतीने आगीत भस्मसात झालेल्या या हॉलची साफ-सफाई, स्वच्छता करुन या ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम करुन त्यादृष्टीने एक पाऊल टाकले आहे. यापुढेही अशाच उपक्रमांद्वारे हॉलच्या जिर्णोद्धारासाठी आम्ही सर्व कलाकार प्रयत्नशील राहतील, असा विश्‍वास श्री.मुन्शी यांनी व्यक्त केला.याप्रसंगी प्रमोद कांबळे म्हणाले, नगरचा कौन्सिल हॉल हा नगरकरांसाठी मोठा अमुल्य ठेवा आहे. या ठिकाणी अनेक नामवंतांनी आपली उपस्थिती लावून या हॉलला पावन केले आहे. या हॉलसाठी कलाकारांबरोबरच नगरकरांनीही पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले.


     या स्वच्छता अभियानानंतर गायक पवन नाईक व सहकार्‍यांनी या ठिकाणी सुमधूर गीते सादर करुन कौन्सिल हॉलच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्रमोद कांबळे यांनी राष्ट्रपुरुषांची चित्रे रेखाटली. या स्वच्छता अभियानासाठी मनपा कर्मचार्‍यांनीही परिश्रम घेतले.    - मनपाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील इतिहासप्रेमी व सामाजिक संस्था यांनी जुन्या मनपातील कौन्सिल हॉलमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी स्थायी समिती सभापती अविनाश घुले, इतिहास तज्ञ भुषण देशमुख, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, पंकज मेहेर, शिल्पकार प्रमोद कांबळे, गायक पवन नाईक, अमोल बासकर, भरत बागरेजा, संजय दळवी आदि. (छाया : राजु खरपुडे 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News