रस्ते म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत ही रक्तवाहिनी तुम्ही आम्ही मिळून जनसामान्यांच्या बळावर आज सुरू करत आहोत असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे


रस्ते म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत ही रक्तवाहिनी तुम्ही आम्ही मिळून जनसामान्यांच्या बळावर आज सुरू करत आहोत असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण: शरीरात जशा रक्त वाहिन्या आहेत तसेच हे रस्ते म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत आणि ही रक्तवाहिनी तुम्ही आम्ही मिळून जनसामान्यांच्या बळावर आज सुरू करत आहोत असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे यांनी आज हसणापूर येथे केले.

जि.प. सदस्या सौ हर्षदाताई काकडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर हसनापुर ते राक्षी रस्त्याच्या कामाचे मजबुतीकरण कामाचा शुभारंभ आज करण्यात आला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रघुभाऊ ढाकणे हे होते. कार्यक्रमासाठी अर्जुनराव ढाकणे जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे, सरपंच नवनाथ ढाकणे, अर्जुनराव ढाकणे, पांडुरंग ढाकणे,गहिनीनाथ ढाकणे, महादेव ढाकणे, जनार्धन ढाकणे, काकाभाऊ ढाकणे, सुखदेव खंडागळे, श्रीमंत ढाकणे, शिवराम ढाकणे, अजिनाथ विघ्ने, रामेश्वर पालवे, सुखदेव ढाकणे, केशव ढाकणे, अशोक शिरसाठ आदी उपस्थित होते.

  पुढे बोलताना ॲड शिवाजीराव काकडे म्हणाले की, हसणापूरने एकी करून मला निवडणुकीमध्ये मोठी ताकद दिली. तीच कृतज्ञता भावना मनात ठेवून आज आपण या कामाचा शुभारंभ करत आहोत. एकीचे बळ खूप मोठी असते. गावच्या विकासासाठी त्याचा वापर करा व तुमची एकी अशीच कायम ठेवा. तालुक्याच्या पूर्व भागावर नेहमीच लोकप्रतिनिधींकडून विकास कामांमध्ये अन्याय झाला आहे. आमचे पद छोट आहे परंतु त्या प्रमाणात आमची काम करण्याची भावना मोठी आहे. सार्वजनिक जीवनामध्ये दुसऱ्याला देण्यांमध्ये जो आनंद मिळतो तो कशातही नाही. तसंच देण्यामध्ये आनंद शोधणार आमचे कुटुंब आहे असेही ते बोलताना म्हणाले.

           जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे म्हणाल्या की रस्त्याच्या कामासाठी गावातील सर्वांनी एक जूट दाखवली अशीच एकजूट आपल्या गावाच्या विकासासाठी कायम ठेवून. गावातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन शासन दरबारी मांडू असे हर्षदाताई काकडे म्हणाल्या.


:- कित्येक वर्षांपासून आम्ही या रस्त्यांसाठी लढत आहोत. लोकप्रतिनिधीनी याकडे दुर्लक्ष केले. जि प सदस्य हर्षदाताई काकडे यांनी लक्ष घालून रस्ता दिल्याने आमच्या दळण वळणास गती मिळणार आहे.

-  डॉ.अर्जुनराव ढाकणे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News