कोंढापुरीत झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी


कोंढापुरीत झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी

शिरूर | प्रतिनिधी(अप्पासाहेब ढवळे)  शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथील पुणे- नगर महामार्गावरून काल सकाळच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या मद्यधुंद अवस्थेतील बस चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने कोंढापुरीतील चौकात सहा दुचाकी वाहनाबरोबर एका सायकलसह केलेल्या अपघातात एक मंदिर व चार दुकानांचे मोठे नुकसान करत माजी सरपंचासह एका इसमाचा मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर झाले याबाबत सदर बस चालकावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.

          शिक्रापूर पोलीस सूत्राकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की,फिर्यादी राजेश प्रकाश गायकवाड (वय -45वर्ष रा.कोंढापुरी(ता.शिरुर)यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोंढापुरी(ता.शिरुर) येथील पुणे-नगर महामार्गावरून काल सकाळी 10 वाजण्याचा सुमारास 

जेबील कंपनीच्या कामगारांना सोडून (एम.एच.१२ के क्यू.३३१९)या बसवरील चालक अशोक मते हा बस घेऊन चाललेला असताना त्याचा अचानकपणे बसवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडकून बस एका मंदिराला धडकली व चार दुकानांचे मोठे नुकसान करत बस समोरील मोठ्या दगडाला धडकून दगड बसखाली अडकल्याने ती थांबली परंतु या अपघातात बसचा वेग जास्त असल्यामुळे अपघातातील व्यक्तींचे अवयव रस्त्यावर उडून पडले होते.सदरच्या या घटनेची माहिती  पोलिसांना मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाता दरम्यान झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली.

         या अपघातात कोंढापुरीचे माजी सरपंच शामराव लोखंडे,रामचंद्र वाघमोडे हे दोघेही(रा.कोंढापुरी,ता.शिरुर जि.पुणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर कुंडलिक गायकवाड,मंगलसिंग पवार दोघेही (रा.कोंढापुरी,ता.शिरुर,जि.पुणे) तसेच बसचालक अशोक मते(रा.इकोगरम सोसायटी,शिक्रापूर ता.शिरुर,जि.पुणे.)हे तिघे जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याने सदर बस चालकावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News