उरळगांव येथील ग्रामपंचायतीचे सन २०१५ ते २०२० या कालावधीचे विशेष लेखा परीक्षण करण्यात यावे :- अनिल बांडे


उरळगांव येथील ग्रामपंचायतीचे सन २०१५ ते २०२० या कालावधीचे विशेष लेखा परीक्षण करण्यात यावे :- अनिल बांडे

शिरूर | प्रतिनिधी(अप्पासाहेब ढवळे )

             शिरुर तालुक्यातील मौजे उरळगांव येथील ग्रामपंचायतीचे सन २०१५ ते २०२० कारभाराचे विशेष लेखा परीक्षण करणेबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचेकडे निवेदन देऊन केली असल्याची माहिती शिरूर प्रवाशी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी दिली.

      याबाबत अधीक सविस्तर माहिती देत अनिल बांडे म्हणाले की,माहिती अधिकारात उपलब्ध झालेल्या कागदपत्रांच्या आधारे उरळगाव ता.शिरुर,जि.पुणे येथील ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेमध्ये अनेक त्रुटी असून अत्यंत निकृष्ठ दर्जाचे काम पाणी पुरवठा योजनेचे झाल्याचे सकृत दर्शनी दिसत असताना संबंधित ठेकेदाराकडून काम अपूर्ण असताना तसेच पाणी पुरवठा योजना अपूर्ण असतानाही उरळगाव ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली.तसेच धनादेशाव्दारे अनेक प्रकारचे बेकायदेशीर चेक देवून मोठा भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास येत आहे.

        सन २०१५ ते २०२० या कालखंडामध्ये स्थानिक लेखापरीक्षणाकडून झालेल्या लेखापरीक्षण अहवाला मध्ये धनादेश नोंद वही लेखापरीक्षकांसमोर ठेवण्यात आलेली नाही याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे व त्याबाबत ग्रामपंचायतीच्या लेखापरीक्षण अहवाला मध्ये गंभीर ताशेरे ओढण्यात आलेलेआहेत.त्याचबरोबर कार्यालयीन खर्चावर देखील बऱ्याच प्रकारचे बोगस खर्च दाखविण्यात आलेला असुन याबाबत गांभिर्याने विचार करुन मौजे उरळगांव ता. शिरुर, जि. पुणे या ग्रामपंचायतीचे सन २०१५ ते २०२० या कालावधीचे विशेष लेखा परीक्षण करण्यात यावे अशी मागणी दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली असल्याचे शिरूर प्रवाशी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी सांगितली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News