वाघोलीपासुन शिरूरपर्यंत फ्लायओव्हर झाल्यावर ट्रॅफिकचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार तर... शिरूर नगरपरिषदेच्या नुतन प्रशासकीय इमारतीमुळे शिरूर शहराच्या वैभवात भर पडणार -- खासदार डाॅ.अमोल कोल्हे


वाघोलीपासुन शिरूरपर्यंत फ्लायओव्हर झाल्यावर ट्रॅफिकचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार तर... शिरूर नगरपरिषदेच्या नुतन प्रशासकीय इमारतीमुळे शिरूर शहराच्या वैभवात भर पडणार -- खासदार डाॅ.अमोल कोल्हे

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )

            शिरूर नगरपरिषदेची नुतन प्रशासकीय इमारत पाहिल्यानंतर असे वाटते की,नगरपरिषदेच्या काळजात शिरूरकरांसाठी जागा असल्याची जाणीव होते. हि खासीयत असुन या प्रशासकीय इमारतीमुळे शिरूर शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचे प्रतिपादन शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांनी केले.

        शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांनी शनिवार दि.२६ रोजी शिरूर तालुक्याच्या दाै-यावर असताना शिरूर नगरपरिषदेच्या नुतन प्रशासकीय इमारतीच्या विकास कामाची पहाणी केली यावेळी ते बोलत होते.

          यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अॅड.अशोक पवार,सभागृहनेते प्रकाश धारिवाल,नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांसह आजी माजी नगरसेवक व नगरसेविका,पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

                     शिरूर नगरपरिषदेच्या इमारतीचे काम नियोजनबद्ध करण्यात आलेले असुन खेळती हवा,सुर्य प्रकाश असेल यांसह इमारतीच्या कामातील विविध बाबींकडे सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांच्यासह पदाधिका-यांनी दुरदृष्टी ठेवुन अत्यंत बारकाईने लक्ष घालुन करण्यात येत असल्याचे दिसुन येत असल्याने येथील वातावरण प्रसन्न राहणार असल्याने काम करताना कर्मचा-यांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण होऊन नागरिकांची कामे जलदगतीने मार्गी लागण्यास त्यामुळे मदत होणार असुन शिरूर नगरपरिषदेच्या या नुतन प्रशाकीय इमारतीमुळे शिरूर शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचे यावेळी पुढे बोलताना शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे म्हणाले.

---=====-----------==--========-------

        पुणे - नगर हायवेवरील महत्वाचा ट्रॅफिकचा विषय पुढील ५० वर्ष उद्भवणार नाही अशा पद्धतीने मार्गी लावला असुन याबाबत २०२० मध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर बैठकीत चर्चा केली आहे. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी देखील याबाबत पाठपुरावा केला असुन वाघोलीपासुन शिरूरपर्यंत जवळपास १८ लेनचा त्यात खाली ६ मधे ६ व त्यावर ६ लेन असा १८ लेनचा फ्लायओव्हर रॅपीड ट्रान्सपोर्ट सिस्टीम करणार असल्याने येथील ट्रॅफिकचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार असल्याचे यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News