"जीवन आपल्या त्या कहाणीचे जिवंत रूप आहे, जी आपण स्वत:ला सांगत असतो”- डॉ. भावना गौतम


"जीवन आपल्या त्या कहाणीचे जिवंत रूप आहे, जी आपण स्वत:ला सांगत असतो”- डॉ. भावना गौतम

मुंबई : कोरोना महामारीने आरोग्य आणि कौशल्य याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकला आहे, अशा शब्दात एम्ब्रेसलाईफच्या संस्थापक आणि होलिस्टीक हेल्थ कन्सल्टन्सी तसेच वेलनेस कोचिंग देणाऱ्या डॉ. भावना गौतम यांनी आपले मत शुक्रवारी 25 जून 2021 रोजी मुंबईच्या अंधेरी (वेस्ट) येथे आयोजित कार्यक्रमात   व्यक्त केले. समोरील स्वास्थ्याकांक्षी (त्या त्यांना रुग्ण म्हणत नाहीत) श्रोत्यांना संबोधित करत होत्या. मेंदू आणि शरीराच्या समीकरणाला त्या शारीरिक आणि मानसिक कौशल्याचा आधार मानतात.

          पारंपरिक लक्षण, रोग व उपचार पद्धती मनुष्यासाठी अपुऱ्या असल्याचे त्यांना वाटते. एम्ब्रेसलाईफ ही डॉ. भावना यांच्यासाठी तत्काळ निर्माण झालेला एखादा विचार नसून एक प्रवास आहे. हा प्रवास करताना आधी एक वैद्यकीय विद्यार्थी म्हणून आणि मग एक डॉक्टर म्हणून त्यांनी पारंपरिक उपचार आणि त्याचा प्रभाव यामधील सीमारेषा समजून घेतल्या. येथे आजार निपटून काढण्याऐवजी त्यावरील उपचारांवर अधिक भर दिला जातो. व्यक्तीच्या संपूर्णतेला महत्त्व देण्याऐवजी केवळ लक्षणे बघून आजार तुकड्यांनी बरा करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाते आणि केवळ शारीरिक क्षमता व रोगाला केंद्रस्थानी ठेवून अतिमहत्त्वपूर्ण असलेल्या भावनात्मक, बौद्धिक, तसेच आध्यात्मिक बाबी दुर्लक्षिल्या जातात.

         त्या म्हणतात, "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून (टिआयएसएस) हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स करताना मनुष्याच्या आरोग्याचे वास्तव चित्र मला पाहायला मिळाले. मनुष्याचे अंतर्मन आणि त्याबाहेरील वातावरणाचा शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक क्षमतेसाठी असलेले महत्त्व मला समजले."

                             त्या पुढे सांगतात, "त्यानंतरचा आरोग्य विमा क्षेत्रातला किंवा रुग्णालय व्यवस्थापनातील माझा अनुभव असेल, पण मी नेहमी व्यक्तीच्या संपूर्ण कौशल्याचाच विचार केला. बहुतांश रोग किंवा विकार आजघडीला दीर्घकालीन जीवनश्रेणीतील रोगांच्या श्रेणीत येतात. पण आजही जीवनशैलीत गुणात्मक बदल दुर्लक्षित करूनच सर्व रोगांवर उपचार केले जातात. रोगांबाबत आज सगळ्यांनाच माहिती असते, अगदी त्यांनाही, जे त्या रोगाशी झुंज देत आहेत, परंतु आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आमची निवड, आमचे पर्याय आणि आमचा दृष्टिकोन नेमके कोणते तत्व ठरवते ते आपण समजू शकत नाही."

          "एखाद्या व्यक्तीला काय जाणवते, तो काय विचार करतो, तो स्वत:शी वा दुसऱ्यांशी कसा जोडला जातो, दुसऱ्यांशी काय संभाषण करतो, या सर्व बाबी त्याच्या बरे होण्यासाठी, तो सुधारण्यासाठी आणि हरवलेपणातून आयुष्याच्या रिंगणात परत येण्यासाठी उपयुक्त ठरते. हे सर्व आजघडीला जागतिक पातळीवर होणाऱ्या संशोधनाशी संबंधित आहे. ज्यावरून हे ठरले आहे की, एखाद्या व्यक्तीचे मानसिक कौशल्यच त्याचे आरोग्य आणि त्याच्या जीवनातील आनंदाचे मूळ आहे."

          त्यांच्या एम्ब्रेसलाईफचा मूलमंत्रच एक जैविक आणि दीर्घजीवी आंतरशक्तीची निर्मिती करणे हा आहे. ज्याद्वारे व्यक्ती आपल्या जीवनाला योग्य दिशा देण्यात समर्थ बनू शकेल. हा बदल केवळ आपले आरोग्य आणि कौशल्यापर्यंतच राहात नाही, तर आपले संबंध, आपले करीयर, एवढेच नाही तर आपल्या मूळतत्वांपर्यंत जाऊन पोहोचतो. एम्ब्रेसलाईफचा उद्देश्यच तुमच्या सर्वोत्तम कहाणीची संरचना तयार करणे हा आहे. एक अशी कहाणी, जी तुमची प्रतिष्ठा, तुमच्या चिंता किंवा आरोग्याच्या आव्हानांच्या ओझ्याखाली दबणार नाही.तुमच्या मनात एक छुपे स्वप्न आहे, पण ते कधीच पूर्ण होणार नाही असे तुम्हाला वाटते. पण एम्ब्रेसलाईफ तुमचे हे स्वप्नपूर्ण होण्यात तुमचा सहयोगी बनू इच्छितो.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News