शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी कास्ट्राईब शिक्षक महासंघ आणि आरक्षण हक्क कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आक्रोश आंदोलन


शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी कास्ट्राईब शिक्षक महासंघ आणि आरक्षण हक्क कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आक्रोश आंदोलन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ व जिल्ह्यातील अनेक मागासवर्गीय अधिकारी-कर्मचार्‍यांच्या संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आले होते .आक्रोश आंदोलनातील प्रमुख मागण्या - अनुसूचित जाती-जमाती , भटक्या विमुक्त जाती-जमाती, विशेष मागासवर्ग यांना पदोन्नतीतील आरक्षण पूर्वीप्रमाणे देऊन सर्व पदे भरण्यात यावीत . तसेच इतर मागास वर्गालाही पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे .विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फ्रीशिप वेळेवर देण्यात यावी .शैक्षणिक शुल्क कमी करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढवण्यात यावी .गट साधन केंद्रातील (बीआरसी ) मानधन तत्त्वावर कार्यरत विशेष शिक्षक ,विषय शिक्षक व इतर सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे याप्रमुख मागण्यांसह  इतर १७  मागण्यांसाठी हे आक्रोश आंदोलन करण्यात आले .कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती जयश्री कटारे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले .यावेळी कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे , राज्य महासचिव विठ्ठल सावंत , राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे ,राज्याचे ज्येष्ठ उपाध्यक्ष विनोद चव्हाण , राज्य संघटक पौर्णिमाताई रणपिसे  ,पुणे जिल्हा महासचिव मिलिंद थोरात ,हवेली तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड दौंड तालुका अध्यक्ष दुर्योधन चव्हाण , कार्याध्यक्ष रवींद्र अहिवळे , संजय भोसले कुंडलिक कांबळे ,सदानंद चौधरी ,राहुल वाघमारे विश्वनाथ कौले , शारदाताई कौले , श्याम बेंद्रे ,चंद्रकांत शिंदे ,गंगाधर जाधव , गोरखनाथ लडकत ,बाबाजी मेचे ,सुदर्शन मसुरे,संतोष असवले,अनिल तिटकारे,निवृत्ती शेळकंदे,राजेश गाडेकर,भास्कर कुडाळ,शिंदे सर, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News