शिरूर शहरातील लहान मुलांच्या आरोग्य शिबिरात २५० मुलांची तपासणी तर सामाजिक कार्यकर्त्यांचे राजर्षी शाहू कोरोनायोद्धा पुरस्काराने गौरव


शिरूर शहरातील लहान मुलांच्या आरोग्य शिबिरात २५० मुलांची तपासणी तर सामाजिक कार्यकर्त्यांचे  राजर्षी शाहू कोरोनायोद्धा पुरस्काराने गौरव

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )     शिरूर शहरातील कुंभार आळी येथे लहान मुलांच्या आरोग्य शिबिरात २५० मुलांची तपासणी करण्यात आली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान व हिराबाई कावासजी जहांगीर मेडिकल रिसर्च सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला. याबाबत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भगवान श्रीमंदिलकर यांनी माहिती दिली.

        कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील ० ते १८ वयोगटातील मुलांची

तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. गरजेनुसार मुलांना औषध वाटप केले. तसेच सर्वांना मास्क दिल्याचे अनिल सोनवणे यांनी सांगितले.

       कोरोना काळात उल्लेखनीय काम करणाऱ्या संतोष शितोळे, तुकाराम खोले, बंट्टी जोगदंड, दादाभाऊ लोखंडे, सागर पांढरकामे,डॉ.वैशाली साखरे,डॉ. संध्या गायकवाड यांचा राजर्षी शाहू कोरोनायोद्धा पुरस्काराने गौरव करण्यात आला.यावेळी निवासी नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे,माजी सरपंच विठ्ठल घावटे,नगरसेविका अंजली थोरात,नगरसेवक संजय देशमुख, शिवसेना शहर प्रमुख मयूर थोरात,शशिकांत शिर्के,विजय शिर्के,संतोष जामदार,डॉ.शीतल भोर,डॉ.अनघा देशमुख,सोनल कस्तुरे,ओंकार कांबळे,प्रमोद कंगारे,अविनाश शिंदे,लक्ष्मण कांबळे,स्नेहा कांबळे,सुमन शेळके, जयश्री क्षीरसागर आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News