विविध कमिट्यांवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संधी दया..... सचिन साठे


विविध कमिट्यांवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संधी दया..... सचिन साठे

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

पिंपरी ( दि. 26 जून ) राज्य सरकारच्यावतीने जाहीर करण्यात येणाऱ्या तालुका व जिल्हा पातळीवरील विविध कमिट्यांवर आणि विविध कार्यकारी अधिकारी पदावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जास्तीतजास्त संधी मिळवून द्यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली. 

शनिवारी (दि. 26 जुलै ) पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये क्रीडा व युवक कल्याण मंत्री, काँग्रेसचे संपर्कमंत्री सुनील केदार यांनी निवडक कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतली यावेळी साठे यांनी ही मागणी केली. यावेळी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, ज्येष्ठ नेते अभय छाजेड, कमल व्यवहारे, पिंपरी चिंचवडचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. कैलास कदम,

माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, पिंपरी ब्लॉकचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, युवक प्रदेश सरचिटणीस मयूर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, चंद्रशेखर जाधव, हिरामण खवळे, लक्ष्मण रुपनर, बाबा बनसोडे, विशाल कसबे, विश्वनाथ खंडाळे, मकरध्वज यादव, किशोर कळसकर, विराज साठे आदी उपस्थित होते.

यावेळी साठे म्हणाले की, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते संक्रमण अवस्थेत वरिष्ठांचे पाठबळ नसतानाही पक्ष वाढीसाठी काम करत आहेत. याची वरिष्ठ नेत्यांनी आवश्य दखल घ्यावी तसेच या कार्यकर्त्यांच्या भावना संपर्क मंत्री ना. सुनील केदार यांनी प्रदेश अध्यक्ष यांना सांगाव्यात असेही साठे म्हणाले,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News