सिध्देश्वर वनीकरण येथे वृक्षारोपण करण्यात आलेले वृक्ष तोडणा-या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात कटोर कारवाई करण्यात यावी :- तुषार वेताळ


सिध्देश्वर वनीकरण येथे वृक्षारोपण करण्यात आलेले वृक्ष तोडणा-या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात कटोर कारवाई करण्यात यावी :-  तुषार वेताळ

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )

         शिरूर येथील सिध्देश्वर वनीकरण येथे वृक्षारोपण करण्यात आलेले वृक्ष तोडणा-या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी तसेच या परिसरात गस्त घालण्यात यावी अशी मागणी सिध्देश्वर वनीकरण समितीच्यावतीने सदर शिरूर तहसिलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली.

       यावेळी सिध्देश्वर वनीकरण समितीचे तुषार वेताळ,डाॅ.सुरेंद्र ढमढेरे,डाॅ.अतुलकुमार बेंद्रे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संगाचे मा.शरह अद्यक्ष अप्पासाहेब ढवळे,संतोष साळी,,योगेश देशमुख,लक्ष्मीमन डोके,बाळासाहेब थिटे,राज पारके,अमोल शिंदे आदि उपस्थित होते.

       याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शिरूरमध्ये सिध्दीचा पहाड येथे वनविभागाची ८० एकर जागा असुन या जागेतील परिसरात सिध्देश्वर वनीकरण समितीच्यावतीने गेली तीन वर्षापासुन पाच

हजारपेक्षा जास्त विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करून संवर्धन करण्यात येत आहे.

         गेली तीन वर्षांपासुन जोपासलेल्या या मोठ्या झाडांची गेली सहा महिन्यांपासुन अज्ञात व्यक्तीकडुन १०० वड,पिंपळ,उंबर या प्रकारच्या झाडांची कत्तल करण्यात आली असुन सदर प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन शिरूरचे आमदार अशोक पवार,तहसिलदार,वन परिक्षेत्र अधिकारी,पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली असल्याची माहिती सिध्देश्वर वनीकरण समितीचे तुषार वेताळ यांनी सांगितली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News