संत निरंकारी मिशन मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन, १०३ रक्त दात्यांनी केले रक्तदान


संत निरंकारी मिशन मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन, १०३ रक्त दात्यांनी केले रक्तदान

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने शनिवार दि. २६ जून  २०२१ रोजी संत निरंकारी मिशन अंतर्गत, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन ब्रँच दौंड, पुणे झोन च्या माध्यमातून   सकाळी ९:०० ते ४:०० या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी १०३ युनिट रक्त संकलन केले.

  या रक्तदान शिबिराचे उदघाटन श्री.प्रेमसुख कटारिया (माजी नगराध्यक्ष) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, दरम्यान विलास रासकर (सेक्टर संयोजक, नानंगाव),संजय झुंबड (सेवादल संचालक) यांच्यासह मंडळाचे अनेक पदाधिकारी  शिबिराला उपस्थित होते.  

            पुणे झोनचे प्रभारी श्री ताराचंद करमचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात गरजेनुसार रक्तदान शिबिर संपन्न होत आहेत.कोरोनामुळे अनेक रुग्णांना रक्त,प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा या सर्वांची अत्यंत आवश्यकता भासत आहे, त्यामुळे संत निरंकारी मिशनद्वारे  पुणे जिल्ह्यामध्ये आवश्यकतेनुसार रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

            या रक्तदान शिबिरात आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार शिवाजी होले  (प्रमुख, दौंड ब्रँच) यांनी केले. रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सेवादल तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी योगदान दिले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News