राधा खुडेने मिळविलेले यश युवापिढीला दिशादर्शक - संपत बंडगर


राधा खुडेने मिळविलेले यश युवापिढीला दिशादर्शक - संपत बंडगर

भिगवण( प्रतिनिधी)  नानासाहेब मारकड 

राधा खुडे हिने मिळवलेले हे यश हे आत्ताच्या युवा पिढीला दिशा देणारे आहे. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सुद्धा माणूस यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकतो. असे रोटरीचे अध्यक्ष संपत बंडगर  यांनी सांगितले

कलर्स मराठी वाहिनीवरील "सुर नवा ध्यास नवा" यातील तृतीय क्रमांकाची विजेती राधा खुडे हिचा भिगवण सायकल क्लबच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराचे खास वैशिष्ट्य म्हणजे क्लबच्या सदस्यांनी भिगवण ते वालचंदनगर असा सायकल प्रवास करून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी डॉ.नाईक निंबाळकर, केशव भापकर, नामदेव कुदळे, के.डी भांडवलदार , अल्ताफ शेख, औदुंबर हुलगे, अर्जुन तोडेकर, प्रदीप ताटे, संतोष सवाने, संतोष दाताळ, प्रविण ढोले, अकबर तांबोळी, संजय खाडे, उज्जेन शेख, राहूल गुंदेचा, शुभम बंडगर, माऊली मारकड हे उपस्थित होते.

यावेळी सायकल क्लबचे अध्यक्ष संपत बंडगर यांनी सांगितले की , राधा खुडे  मुळे इंदापूर तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News