पत्रकार विनायक साबळे यांच्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल,सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने योग्य ती न्यायाची भूमिका घेण्याची केली मागणी


पत्रकार विनायक साबळे यांच्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल,सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने योग्य ती न्यायाची भूमिका घेण्याची केली मागणी

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )

        शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील हॉस्पिटलच्या आलेल्या वाढीव वीज बिलाची विचारणा करण्यावरून बाचाबाची व धक्का बुक्की झाली.पत्रकार विनायक साबळे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे

या हाणामारीच्या प्रकारामुळे विज वितरण कर्मचाऱ्यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

            शिक्रापूर येथे दोन दिवसांपूर्वी वीज वितरणचे कर्मचारी व एका हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दाम्पत्य यांच्यात हॉस्पिटलच्या आलेल्या वाढीव वीज बिलाची विचारणा करण्यावरून बाचाबाची झाली व कळत नकळत त्याचे रूपांतर धक्का बुक्कीत झाले त्याप्रसंगी हॉस्पिटलचे कर्मचारी तेथे उपस्थित होते. त्यात या हॉस्पिटलचे कर्मचारी असणारे पत्रकार विनायक साबळे यांचाही समावेश होता.या हाणामारीच्या प्रकारामुळे विज वितरण कर्मचाऱ्यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. यात पत्रकार विनायक साबळे यांचे ही नाव फिर्यादी यांनी घेतल्याने त्याच्यावर ही गुन्हा दाखल झाला.परंतु त्याच ठिकाणी अनेक व्यक्ती उपस्थित असताना त्या व्यक्तींची नावे न आल्याने हा सर्व प्रकार केवळ सूडबुद्धीने झाला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. सर्व पत्रकार बांधवांनी या संदर्भात शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना सर्व पत्रकार संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले तसेच झालेल्या प्रकाराबद्दल हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज पाहून या प्रकणाची योग्य ती न्यायाची भूमिका घेण्याची मागणी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने करण्यात आली.

         याप्रसंगी पत्रकार संरक्षण समिती,महाराष्ट्रचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र खुडे,राज्य मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय लोखंडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश वांढेकर,राज्य मराठी पत्रकार परिषदचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील भंडारे,NUJM चे तालुकाध्यक्ष सचिन धुमाळ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष जालिंदर आदक, पुणे शहराध्यक्ष अनिल खुडे,जिल्हा संपर्क प्रमुख उदयकांत ब्राम्हणे,शिरूर तालुका कार्याध्यक्ष शंकर पाबळे, प्रमोल कुसेकर, प्रमोद लांडे,सुनिल पिंगळे, विशाल वर्पे, सूर्यकांत शिर्के, के.डी.गव्हाणे,सतीश केदारी आदीसह अनेक पत्रकार उपस्थित होते.

:- झालेल्या प्रकाराची आम्ही घटना स्थळी जाऊन घटना स्थळाच्या सर्व सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासून,यात नेमके खरे काय आणि खोटे काय हे निष्पन्न करुन योग्य ती कार्यवाही करू                                                                             पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे शिक्रापूर पोलीस स्टेशन

जाहिरात
Search
विडिओ
Recent News