ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी भाजपाच्या वतीने कर्जत मधे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.


ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी भाजपाच्या वतीने कर्जत मधे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

मोतीराम शिंदे कर्जत प्रतिनिधी :  कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी कर्जत येथील मेन रोडवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या  चक्काजाम आंदोलना यबाबतचे निवेदन कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की राज्य सरकारच्या हलगर्जी पणामुळे राज्यातील सर्व ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले असून त्यामुळे सर्व ओबीसी समाजामध्ये तीव्र स्वरूपाची संतापाची लाट उसळली आहे. तरी या असंतोषाचा फार मोठ्या प्रमाणावर उद्रेक होऊ शकतो तरी शासनाने याबाबत गंभीर दखल घ्यावी असे या निवेदनात भाजपाच्या वतीने म्हंटले आहे. तसेच या निवेदनात म्हटले की राज्यातील आघाडी सरकारच्या ओबीसी समाजा  विरोधातील धोरणाचा कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून  ओबीसी आरक्षणाविरोधात राज्य सरकारनं लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास राज्यामध्ये तीव्र स्वरुपाचे आंदोलने करण्यात येतील असे या निवेदनातून म्हटले आहे. या चक्काजाम आंदोलनात कर्जतच्या माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, नगरसेविका उषा राऊत, नगरसेविका राणी गदादे, भाजपा महिला ओबीसी आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉक्टर कांचन खेत्रे, भाजपा ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सचिव मंदाताई होले, भाजपा ओबीसी मोर्चाच्या  जिल्हा सदस्या आशाताई वाघ, ओबीसी मोर्चा जिल्हा महिला आघाडीच्या सरचिटणीस   प्रतिभा रेणूकर, भाजपा महिला शहराध्यक्षा आरती थोरात, तसेच भाजपा तालुकाध्यक्ष-डॉ सुनील गावडे, अशोक खेडकर, शांतीलाल कोपनर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, काकासाहेब धांडे, युवा मोर्चा अध्यक्ष-ज्ञानदेव लष्कर,पप्पू धोदाड,विनोद दळवी, अनिल गदादे, डॉ. विलास राऊत,सतीश समुद्र,अमृत काळदाते, आदी उपस्थित होते यावेळी डॉ. कांचन खेत्रे, डॉ सुनील गावडे, शांतीलाल कोपनर, अशोक खेडकर, प्रतिभा भैलुमे, सचिन पोटरे आदींचे भाषने झाले. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. - ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण लागू करण्यात यावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्जत येथे आयोजित केलेल्या चक्का जाम आंदोलनात अनेक नेते उपस्थित नव्हते. भाजप राज्यात सत्तेवर असताना व प्रा. राम शिंदे मंत्री असताना ज्या मोठ्या पुढाऱ्यांनी सत्तेचा फायदा घेतला असे कर्जत नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर तसेच खासदार सुजय विखे पाटील समर्थक व जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांनी मात्र या आंदोलना कडे पाठ फिरवल्याने कार्यकर्त्यां मधे या बाबत जोरदार कुजबुज पाहावयास मिळाली

जाहिरात
Search
विडिओ
Recent News