कांबी हायस्कूल कांबी येथे आबासाहेब काकडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन


कांबी हायस्कूल कांबी येथे आबासाहेब काकडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

शेवगाव प्रतिनिधी, सज्जाद पठाण : एफ.डी.एल. शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कॉ.जगन्नाथ कान्होजी उर्फ आबासाहेब काकडे यांच्या जयंतीनिमित्त आज कांबी हायस्कूल कांबी येथे विद्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरुण वावरे होते. यावेळी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करून व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थिनी कु.राजनंदिनी खरड, कु.अमृता भेरे, कु.आरती म्हस्के यांनी तसेच ज्येष्ठ शिक्षिका वत्सला जाधव, सचिन शिंदे यांनी आबासाहेबांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य विशद केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापक अरुण वावरे यांनी सांगितले की, आबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, श्री संत गाडगे महाराज यांनी केलेल्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवला. समाजातील गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी, शेतकरी यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या. आज या संस्थेत मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा चालू आहेत. माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालये, व्यावसायिक महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालये उच्च दर्जाने सुरू असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठ्या शहरात जाण्याची आवश्यकता भासत नाही. असे महान कार्य करण्याचे कॉ.आबासाहेबांचे स्वप्न संस्थेत साकारले जात आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदू खाडे यांनी तर आभार श्रीमती. आशाबाई कानडे यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News