दौंड आणि इंदौर दरम्यान विशेष ट्रेन सेवा पूर्ववत


  दौंड आणि इंदौर दरम्यान विशेष ट्रेन सेवा पूर्ववत

रेल्वेने दौंड आणि इंदौर दरम्यान सध्याच्या मार्गावर/वेळेवर आणि त्याच संरचनेसह विशेष ट्रेनची सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खाली दिलेल्यानुसार:  

02943 दौंड - इंदौर विशेष ट्रेन दि. २९.६.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत सुरू होत आहे.  

02944 इंदौर - दौंड विशेष ट्रेन ट्रेन दि. २८.६.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत सुरू होत आहे.  

आरक्षण :  विशेष ट्रेन क्रमांक 02943 साठीचे सामान्य शुल्कासह बुकिंग दि. २६.६.२०२१ रोजी सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.  

बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी सर्व प्रकारच्या मानदंडांचे, कोविड-१९शी संबंधित एसओपीचे पालन करून या विशेष ट्रेनमध्ये फक्त कंफर्म तिकीट असणार्‍या प्रवाशांनाच परवानगी दिली जाईल.

  --- ---

( दिनांक: २५ जून २०२१ प्रप क्र. 2021/06/50 मध्य रेल्वे, जनसंपर्क विभाग यांचे द्वारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई )
जाहिरात
Search
विडिओ
Recent News