पळशीत वटपौर्णिमा उत्साहात साजरी


पळशीत वटपौर्णिमा उत्साहात साजरी

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) बारामती तालुक्यातील पळशी याठिकाणी वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांच्या आनंदाचा सण असलेला वटपौर्णिमा हा सण गुरुवारी (ता. २४) पारंपरिक पद्धतीने आनंदी वातावरणात लोणी भापकर, पळशी, मासाळवाडी, सायबांचीवाडी, माळवाडी व परिसरात साजरा करण्यात आला. 

  सणानिमित्त सुवासिनींच्या आनंदाला उधाण आले होते. दागदागीने लेऊन व मराठमोळी वस्त्रपरिधान करुन पळशीत सुवासिनींनी वटवृक्षाची व ग्रामदैवत असलेल्या हनुमान देवतेची मनोभावे पुजा केली. व वटवृक्षाला सात फेरे घालून अखंड सौभाग्यासाठी साकडे घातले.

    सकाळपासूनच महिलांनी जास्त गर्दी न करता कमी-अधिक प्रमाणात दिवसभरात वडाच्या झाडाची पूजा करून वटपौर्णिमा सण उत्साहात पारंपारिक पद्धतीने साजरा केला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News