श्रीगोंदा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोविड केअर सेंटर मध्ये दक्ष नागरिक फाऊंडेशनच्या माध्यमातुन वट पोर्णिमा सण साजरा.


श्रीगोंदा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोविड केअर सेंटर मध्ये दक्ष नागरिक फाऊंडेशनच्या माध्यमातुन वट पोर्णिमा सण साजरा.

 श्री गोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी:  पॉझिटीव्ह आल्याने काही महिला श्रीगोंद्यातील कोविड सेंटरमध्ये अॅडमिट आहेत. आजाराच्या धक्यामुळे सण विसरुन गेल्या होत्या. दक्ष नागरिक फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप हे सकाळी कोविड सेंटरमध्ये जावुन महिलांशी चर्चा केली. तुम्ही वटपोर्णिमा साजरी करु इच्छित असाल तर साहित्य आणुन देतो असे सांगितले. महिलांनी होकार दिल्यावर आज दुपारी कोरोनाचे सर्व शासकिय नियमांचे पालन करत वटपोर्णिमा साजरी करण्यात आली. या सर्व महिलांच्या हस्ते वडाच्या झाडाचे रोपण करण्यात आले. कोविड सेंटरमध्ये असुन सुध्दा यावर्षी सण साजरा करण्यास मिळाला. या अनोख्या कार्यक्रमाने महिला गहिवरल्या.

    यावेळी डॉ.नितीन खामकर, मुख्याधिकारी मंगेश देवरे, डॉ.श्रीकांत शेळके, डॉ. अंजली दातीर, परिचारिका ज्ञानेश्वरी सावंत, दत्ताजी जगताप, श्रीरंग साळवे, धनेश गुगळे, प्रसाद टकले, कोविड सेंटरमधील महिला उपस्थित होत्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News