पर्यावरण संवर्धनासाठी निमगाव वाघात वडांचे झाड लाऊन वटपौर्णिमा साजरी, वृक्षरोपण करुन महिलांनी केली वडाची पूजा


पर्यावरण संवर्धनासाठी निमगाव वाघात वडांचे झाड लाऊन वटपौर्णिमा साजरी, वृक्षरोपण करुन महिलांनी केली वडाची पूजा

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- वटपौर्णिमेला सात जन्मात हाच पती मिळो, यासाठी वडाच्या झाडाला धागा बांधला जात असतांना नगर तालुक्यातील निमगाव वाघा (ता. नगर) येथे महिलांनी वडाच्या वृक्षांचे रोपण करुन, विधीवत पूजा करीत वटपौर्णिमा साजरी केली. पर्यावरण संवर्धनासाठी नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. 

निमगाव वाघा येथे नवनाथ विद्यालयाच्या परिसरात वडांची रोपे लाऊन वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. तर मागील चार-पाच वर्षात लावण्यात आलेल्या वडांच्या झाडांची शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव या महिलांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्था व वाचनालयाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, काशीनाथ पळसकर, चंद्रकांत पवार, दत्तात्रय जाधव, उत्तम कांडेकर, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, निलिमा काळे, मंदाताई डोंगरे, सुलभा पवार, आशाबाई ठाणगे, कोमल ठाणगे, राजू सुर्यवंशी आदी उपस्थित होते. पै.नाना डोंगरे म्हणाले की, सण, उत्सवात सर्वांनी एकत्रित येऊन वृक्षरोपण चळवळीला चालना दिल्यास पर्यावरणाचा समतोल साधला जाणार आहे. कोरोना काळात पर्यावरण व आरोग्याचे महत्त्व सर्वांना समजले आहे. ऑक्सिजनचा एकमेव वृक्ष स्त्रोत असून, वृक्ष लाऊन जगविणे काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक किसन वाबळे यांनी वटवृक्षाचे प्रमाण दिवसंदिवस वृक्ष तोडीमुळे कमी होत असून, महिलांना गावोगावी वृक्षाचे झाडे पूजेसाठी वटपौर्णिमेच्या दिवशी शोधावी लागतात. मोठ्या शहरात तर या झाडांच्या फांद्या विकत घेऊन त्याची पूजा करण्याची वेळ येते. आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून वडाच्या झाडांची संख्या वाढणे आवश्यक आहे. सर्वाधिक प्राणवायू देणारा तर कार्बनडॉय ऑक्साईडचे शोषण करुन प्रदुषण नियंत्रीत करणारे वडाचे झाड असून, त्याची लागवड होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. संदिप डोंगरे यांनी पशु-पक्ष्यांचा निवारा वृक्षावरती असतो. इतर सुक्ष्मजीवही या झाडांचा आधार घेत असून, सजीव सृष्टीसाठी झाडे आवश्यक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News