विविध सामाजिक संघटनांसह सभापती घुले यांच्याकडून पाहणी मनपाच्या कौन्सिल हॉलला पुर्नवैभव प्राप्त करुन देणार - अविनाश घुले


विविध सामाजिक संघटनांसह सभापती घुले यांच्याकडून पाहणी    मनपाच्या कौन्सिल हॉलला पुर्नवैभव प्राप्त करुन देणार - अविनाश घुले


- अहमदनगर महानगरपालिकेच्या जुन्या कॉन्सिल हॉलची पाहणी स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी करुन नुतनीकरण करण्याबाबतचा आढावा घेतला. याप्रसंगी इतिहास तज्ञ भुषण देशमुख, रोटरी इंटीग्रेटी क्लबचे अध्यक्ष रफिक मुन्शी, विनित साठे, इंजि.सुरेश इथापे आदि. (छाया : राजु खरपुडे)

 अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत -) जुन्या मनपा कार्यालयातील कौन्सिल हॉल आगीत भस्मसात होऊन आता जवळजवळ सात वर्षे झाली आहे, याबाबत सामाजिक संघटनांनी आपल्याकडे या हॉलचे नुतनीकरण करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार आज पाहणी करण्यात आली असून, या हॉलचे नुतणीकरणासाठी महापालिका जिल्हा नियोजन समितीकडे विशेष बाब म्हणून हॉलचा जिर्णोद्धार करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.  हा कौन्सिल हॉल ऐतिहासिक असून, अनेक दिग्गजांच्या सभा, बैठका या हॉलमध्ये झालेल्या आहेत, त्यामुळे हा कौन्सिल हॉल नगरकरांच्यादृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. अनेक आठवणी या कौन्सिल हॉलशी संबंधित आहेत.  सामाजिक संस्था घेत असलेला पुढाकारास आपण सकारात्मक प्रतिसाद देत या हॉलला पुर्नवैभव प्राप्त करुन देण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे प्रतिपादन मनपा स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी केले.अहमदनगर महानगरपालिकेच्या जुन्या कॉन्सिल हॉलची पाहणी स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी करुन नुतणीकरण करण्याबाबतचा आढावा घेतला. याप्रसंगी इतिहास तज्ञ भुषण देशमुख, रोटरी इंटीग्रेटी क्लबचे अध्यक्ष रफिक मुन्शी, विनित साठे, इंजि.सुरेश इथापे आदि उपस्थित होते.


     यावेळी भुषण देशमुख म्हणाले, नगर शहर हे ऐतिहासिक शहर आहे, त्यामुळे येथील वास्तूंचे जतन होणे क़ाळाची गरज आहे. येणार्‍या पिढ्यांना या ऐतिहासिक वास्तूंमुळे नगरच्या तात्कालीन वैभशाली परंपरा समजेल. मनपाचा कौन्सिल हॉल हा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. परंतु आगीत भस्मसात झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून त्याची दुरावस्था झाली आहे. आता या हॉलचा जीर्णोद्धार व्हावा, अशी अनेकांची अपेक्षा आहे.


     याप्रसंगी रफिक मुन्शी म्हणाले, मनपचा कौन्सिल हॉलचा जीर्णोद्धार व्हावा, यासाठी विविध सामाजिक संघटना नेहमीच प्रयत्नशील आहेत. त्यासाठी मनपाने पुढाकार घेऊन नुतनीकरण होणे गरजेचे आहे. सभापती अविनाश घुले हॉलच्या जिर्णोद्धारासाठी घेत असलेला पुढाकार सामाजिक संस्थांसाठी आनंददायी बाब आहे. त्यासाठी विविध सामाजिक संस्थाही सहकार्य करतील. त्यासाठी मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त 29 जुनला सकाळी 8 वा. या कौन्सिल हॉल स्वच्छता अभियान विविध संस्था राबविणार असल्याचेही श्री.मुन्शी यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News