कृतज्ञता हा मानवी जीवनातील सर्वात मोठा आविष्कार आहे शिवाजीराव काकडे


कृतज्ञता हा मानवी जीवनातील सर्वात मोठा आविष्कार आहे शिवाजीराव काकडे

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण : हेसंस्कार पुढील पिढीत रुजविण्यासाठी कोविड सेंटर मधील डॉक्टर व आरोग्य सेवक यांचा गौरव आपण करत आहोत असे प्रतिपादन जनशक्तीचे अध्यक्ष ॲड शिवाजीराव काकडे यांनी अमरापुर येथे केले. आज अमरापुर येथे जनशक्तीच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या अमरापूर व चापडगाव कोविड सेंटरच्या सर्व डॉक्टर्स, आरोग्य सेवकांचा कृतज्ञता सोहळा पार पडला. कार्यक्रमास उप विभागीय पोलीस अधिकारी. सुदर्शन मुंडे, नायब तहसीलदार काथवटे साहेब, जि. प. सदस्या सौ हर्षदा काकडे,आरोग्य अधिकारी डॉ.कैलास कानडे, सुरेश पाटेकर, गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी गणेश मोटकर, डॉ.श्वेता फलके, डॉ. विजय फलके, डॉ. अरविंद पोटफोडे, डॉ. मुकुंद गमे, डॉ. सोमनाथ काटे, डॉ. प्रमोद नेमाने, डॉ.गणेश पाडळे, डॉ. रोहित पाटील, जगन्नाथ गावडे, सरपंच विजय पोटफोडे, बाळासाहेब मरकड, भाऊसाहेब कणसे, जालिंदर कापसे, संजय खरड, दिलीप भुसारी, सुरेश चौधरी, राजेंद्र पोटफोडे, अशोक मस्के, अशोक काळे, आसाराम शेळके, बाळासाहेब पाटेकर, रमेश भालसिंग, संतोष चोरडिया, हरिश्चंद्र निजवे, अजीमभाई शेख, रघुनाथ सातपुते, म्हातारदेव आव्हाड, आबासाहेब राऊत, शंकराव काटे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना ॲड. काकडे म्हणाले की, कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह व जनशक्तीने अमरापुर व चापडगाव या ठिकाणी कोविड सेंटर चालविले. येथील सर्व डॉक्टर्स व स्वयंसेवक यांनी हजारो रुग्णांना या काळात आजारातून अल्पशा खर्चात बरे केले. जिल्ह्यामध्ये खूप आदर्श असे काम या दोन्ही कोविड सेंटरमधील डॉक्टरांनी व आरोग्य सेवकांनी केले. त्यांच्या सेवेची दखल घेऊन आज हा सत्कार सोहळा आपण आयोजित केला आहे आमच्या घरामध्ये समाजसेवेचा वसा कै. आबासाहेबांपासून आहे. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून आमची सेवा चालू असते. असे संकटे आल्याशिवाय आपले कोण व परके कोण हे कळत नाही ते या आजाराने दाखवून दिले आहे असे ॲड काकडे म्हणाले.

 यावेळी डॉ. विजय फलके म्हणाले की, काकडे दाम्पत्यांनी आम्हा डॉक्टरांना या ठिकाणी सुविधा पुरवली ती खूप महत्वाची होती. प्रत्येक रुग्ण घरातलाच आहे असे समजून त्यांनी आमच्याबरोबर रुग्णांचीही काळजी घेतली. चांगल्या कामाची पावती हि नेहमी मिळतच असती. आज ती थाप आमच्या पाठीवर काकडे दाम्पत्याने टाकली याने पुढील काम करण्यास निश्चित बळ मिळाले आहे. 

डि.वाय.एस.पी. मुंडे म्हणाले की, अशा कृतज्ञता सोहळा कार्यक्रमामुळे डॉक्टरांचे मनोधैर्य वाढण्यास मदत होते. काकडे दाम्पत्यांनी हा कौतुकास्पद उपक्रम केला. चांगल्या माणसांचे याठिकाणी गौरव केला.

 डॉ.पोटफोडे म्हणाले की, ॲड शिवाजीराव काकडे व सौ काकडे ताई यांनी मला हे कोविड सेंटर चालवताना काहीही कमी पडू दिले नाही. माझे हाताखाली कर्मचारी कमी होते ते सुद्धा त्यांनी पुरविले व त्यांनीही डॉक्टरांसारखी सेवा रुग्णांना दिली. सर्व रुग्णांना जेवण, नाश्ता, गुळवेल काढा व इतर सुविधा दिल्या. प्राणायाम, योगा हे स्वतः शिवाजीराव काकडे यांनी रुग्णांकडून करून घेतला असेही ते म्हणाले. कार्यक्रमास प्रशांत भराट, राजेंद्र गर्जे, बाबा इनामदार, डॉ. विजय लांडे, सुखदेव खंडागळे, वैभव पूरनाळे, रघुनाथ घोरपडे, तुळशीराम रुईकर, शंकर काकडे, शिवाजी कणसे, ह.भ.प.मुखेकर महाराज,  ह.भ.प.भोसले महाराज, मल्हारी अडसरे, पाराजी नजन अनेक बरे झालेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक, अमरापूर व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. सोशल डिस्टंसिंग व कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र पोटफोडे यांनी तर आभार प्राचार्य अरुण वावरे यांनी केले.

 - डॉक्टर्स व आरोग्य सेवक यांची अमरापूर गावामधून भव्य वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांनी त्यांचे घरोघरी औक्षवण करत शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News