भीमाशंकर अभयारण्यात ४८२ शेकरू आढळून आले ..


भीमाशंकर अभयारण्यात ४८२ शेकरू आढळून आले ..

विलास काळे, घोडेगाव प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे वन्यप्राणी मानचिन्ह असलेल्या शेकरूंची भीमाशंकर अभयारण्यात ४८२ शेकरू आढळून आले संपुर्ण जंगलात १६ हजार ३४३ घरटी व ४८२ शेकरू आढळून आले असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी सांगितले.

पानगळी रानांपासुन ते सदाहरित अरण्यापर्यंत अनेक प्रकारच्या जंगलांनी आपल्या महाराष्ट्राला समृध्द केलं आहे. या सगळया जंगलातील वन्य जीवांमधून महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून निवड कोणाची करायची? या अवघड प्रश्नाचं उत्तर मिळालं. पुण्याजवळच्या भीमाशंकरच्या अभयारण्यात या जंगलाची शान म्हणजे इथे आढळणा-या जायंट स्क्विरल अर्थात शेकरू. तसे अगदी हिमालयाच्या पायथ्यापासून ते केरळच्या जंगलापर्यंत भारतात शेकरूच्या एकुण सात उपप्रजाती आढळतात. पण भीमाशंकर येथे आढळणारे शेकरू मात्र फक्त भीमाशंकरच्या रानातच आढळतात. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच सापडणारा प्राणी म्हणून या भीमाशंकरी शेकरूची निवड राज्यप्र्र्राणी म्हणून झाली.

भीमाशंकरचे अभयारण्य ११४ चौरस किलामीटरमध्ये पसरलेले असून भीमाशंकर अभयारण्य क्र. १ व २ अशा दोन भागांत विभागले गेले आहे. शेकरू झाडाची पाने, काटक्या यांच्या सहा्ययाने घुमटकार आकाराची घरटी बनवते. शेकरू डिसेंबर -जानेवारी महिन्यात मिलन करतात. एक मादी दरवर्षी प्रजनन करेलच असे नाही. त्यामुळे शेकरूंची संख्या झपाटयाने वाढत नाही. शेकरू वर्षातून एकवेळा एका बछडयाला जन्म देतो. मादी सहा महिने पिल्लांचे संगोपन करते. शेकरू मोठया आकाराच्या गर्भ घरटयात पिल्लांना जन्म देतात. त्यामुळे ही गर्भ घरटी मोठया आकाराची असतात. शेकरू सर्वसाधारणपणे झाडावर राहाणारा प्रामुख्याने फळे खाणारा व फळे नसतील तर बीज, झाडांची फुले, साल खाणारा प्राणी आहे. सर्प व गरूड शेकरूंची शिकार करतात.

भीमाशंकर अभयारण्यातील दोन परीमंडळांतील १२ नियम क्षेत्रात शेकरूंची गणना घरटी मोजुन व प्रत्यक्ष दिसलेल्या शेकरूंची नोंद घेऊन गणना केली गेली. घरटी पाहताना वापरलेली, दुरूस्तीची गरज असलेली, सोडून दिलेली व गर्भ घरटी अशा चार प्रकारची घरटी शोधून नोंदी केल्या गेल्या. घरटयांची नोंदी घेताना ठिकाण, झाडाचा प्रकार, शेकरू प्रत्यक्ष दिसल्यास त्याचे ठिकाण याच्या नोंदी अक्षांश-रेखांशासह घेण्यात आल्या.

शेकरून गणना वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक एस. रमेश कुमार, सहायक वनसंरक्षक दिलीप भुर्के, यांच्या मागदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण, वनपाल एन. एच. गि-हे, एम. जी. वाघुले यांच्यासह वन्यजीव विभागाच्या वनरक्षकांनी मिळुन केले. भीमाशंकर अभयारण्यातील कोंढवळ, निगडाळे, भोरगिरी, आहुपे, पिंपरगणे, भट्टी, भोमाळे, वेहळोली, साखरमाची, साकेरी, पाटण, घाटघर या क्षेत्रात गणना केली. गणनेदरम्यान मोठया आकाराची घरटी जास्त प्रमाणात दिसल्याने शेकरू संगोपनाच्या दृष्टीने अतिशय चांगली बाब समोर आली असल्याचे वसंत चव्हाण यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News