साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे यांची निवड


साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे यांची निवड

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने काळे यांचे अभिनंदन

कोपरगाव प्रतिनिधी :- शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी कोपरगाव विधानसभेचे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती झाल्याने कोपरगावकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासुन संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष पदाच्या निवडीकडे साई भक्तांचे लक्ष लागले होते. मंगळवार (दि.२२ जून) रोजी आमदार आशुतोष काळे यांची निवड जाहीर करण्यात आली.

      कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांची साई संस्थानच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, प्रदेश महासचिव शेख फकीर महंमद, सचिव किशोर गाडे, प्रदेश उपाध्यक्ष बी. के. सौदागर, प्रदेश कार्याध्यक्ष अमीर भाई जागीरदार, अहमदनगर जिल्हाध्यक्ष राज मोहम्मद शेख, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख, श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष जावेद शेख, अकबर भाई लाल भाई शेख, अमीर बेग मिर्झा, अरुण बागुल, रमेश शिरसाट तसेच पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे, पुणे जिल्हा सचिव अफजल खान, शहराध्यक्ष हनीफ भाई तांबोळी तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News