वृक्ष मित्रांचे कार्य कौतुकास्पद


वृक्ष मित्रांचे कार्य कौतुकास्पद

बापूसाहेब भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करताना वृक्षमित्र समितीचे सन्माननीय सदस्य

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

वाढदिवस म्हटलं की केक कापणे डीजे वाजवणे हॉटेलवर पार्ट्या धाडणे परंतु याला अपवाद ठरतायेत वरूर गावची युवा पिढी गेल्या वर्षभरापासून या गावातील युवा मित्रांनी एकत्र येत आपला वाढदिवस थाटामाटात साजरा न करता शालेय परिसरात वृक्षारोपण करून साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि बघता बघता गावातील सर्वच युवा मित्र एकत्र येत आज गावामध्ये युवा मित्रांच्या माध्यमातून सुमारे 250 ते 300 झाडांची लागवड झाली आहे तसेच या झाडांना गावातील युवकांनी झाडांना जाळी बसवणे जेसीबी लावून खड्डे खणणे इत्यादी कामे स्वखर्चातून केली आहेत तसेच युवक दर दिवशी नित्यनियमाने झाडांना पाणी घालतात त्यांचे संगोपन करतात युवकांनी गावामध्ये प्रबोधन करून स्मृती वृक्ष लागवडीचा ही उपक्रम हाती घेतला आहे आणि याच स्मृती वृक्ष लागवडी मुळे गावा मध्ये किमान वीस ते पंचवीस झाडे ही वटवृक्षाचे लावली आहेत यामध्ये विविध प्रकारचे फळ फुलांची झाडेही लावली आहेत तसेच शालेय परिसर नदी काठ चा परिसर हा थोड्याच दिवसात ऑक्सीजन पार्क म्हणून नावारूपास येत आहे गावाच्या वैभवात ही त्यामुळे भर पडत आहे तसेच अनावश्यक खर्चाला फाटा देत सुरू केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला शेवगाव पाथर्डी च्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी ही भेट देत वृक्ष लागवड करून युवावर्गाला पाठिंबा दिला तसेच सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

वृक्षमित्र समितीचे सदस्य इमाम पठाण, निलेश मोरे सर, कानिफ म्हस्के, गणेश म्हस्के, भाऊसाहेब पाचरणे, शंकर भुजबळ, बापूसाहेब भुजबळ ,गणेश मोरे, अनिल वावरे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News