अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ग्रामीण भागात लसीकरण सुरुवात.


अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ग्रामीण भागात लसीकरण सुरुवात.

हनुमंत पंडित मांडवगण फराटा प्रतिनिधी:

 फराटा ता. शिरूर (दि.२३) येथे १८ते४५ व ४५ च्या पुढील लोकांना लसीकरण करण्यात आले. बऱ्याच दिवसांनी लस उपलब्ध झाल्याने अभूतपूर्व गर्दी झाली होती. १८ते ४५ वयोगटातील तरुणवर्ग लसीकरण करण्याचा राहिले होते. शहरात लसीकरण सुरू होऊन बरेच दिवस झाले तरी ग्रामीण भागात लसीकरण राहिले होते. अनेक जण प्रतीक्षेत होते. शासनाने खाजगी दवाखान्यात लस देणे बंद केले होते. काहीजण शहरात जाऊन लस घेऊन आले आहेत. प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी लस उपलब्ध झाल्याचे सर्वाना कळविले.त्यामुळे आज पहिलाच दिवस असल्याने अलोट गर्दी झाली होती.त्यांना आटोक्यात आणण्यासाठी आपल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी गुंड साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच गर्दीचे नियोजन करून सर्वाना शिस्तबद्ध पद्धतीने शांततेत लसीकरण होण्यासाठी मदत झाली.

आता दररोज १८ ते ४५ व ४५ च्या पुढील सर्वांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु राहणार आहे. तसेच उपकेंद्रे वडगाव रासाई,शिरसगाव काटा,इनामगाव,गणेगाव दुमाला या ठिकाणी उद्या पासून दोन्हीही वयातील लोकांचे लसीकरण होणार आहेत असे डॉ. सातपुते मॅडम यांनी सांगितले. आज दिवसभरात ३०० लोकांना लस देण्यात आली.त्यामुळे मेजर गुंड साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे मॅडम, हरिमामा फराटे, बालाजी कांबळे,राहुल सुराणा,हनुमंत पंडित उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News