जोशीवाडी येथील पुलाचा कठडा नादुरुस्त असल्याने धोकादायक


जोशीवाडी येथील पुलाचा कठडा नादुरुस्त असल्याने   धोकादायक

सार्वजनीक बांधकाम विभागाकडून जाणीवपूर्वक केली जाते डोळे झाक...?

शिरूर | प्रतिनिधी ( अप्पासाहेब ढवळे  )

शिरुर शहरात जोशीवाडी येथील संगमेश्वर रेसीडन्सी

(डेरेमामा कॉम्प्लेक्स) समोरील नाल्यावरील  तसेच पंजरापोळ येथील पुलाचा कठडा तुटल्याने या ठिकाणी अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत तसेच संतप्त नागरीकांनी यापूर्वी सार्वजनीक बांधकाम विभागाचे शिरुर येथील अधीकारी यांच्याकडे तक्रार केली असता त्यांच्याकडून अपमानास्पद वागणूक देऊन उडवा उडवीची उत्तरे मिळाल्याने नागरीकांनी सार्वजनीक बांधकाम विभाग प्रकल्प पुणे यांच्याकडे तक्रार देखील केली होती .

        यापूर्वी शिरूर येथील सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता वाघमोडे यांना तक्रार करून हि त्याची कोणत्याही प्रकार दखल न घेतल्याने सार्वजनीक बांधकाम विभाग पुणे येथे नागरिकांनी तक्रार देखील केली  त्यानुसार शाखा अभियंता गवळी यांनी सदर ठिकाणाला भेट देवून त्याची पाहणी केली व पुलाच्या कठड्याचे काम करु असे आश्वासन दिले. उपस्थित नागरीकांनी त्यांना कठड्याचे काम लवकरात लवकर झाले पाहिजे अन्यथा जर पुन्हा कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना घडल्यास जीवीत हानी झाल्यास सर्व गोष्टींना सार्वजनीक बांधकाम विभाग जबाबदार राहील अशी

थेट भूमिका घेतली.परंतु या उटलेल्या कठड्याचे काम करण्यात आले हे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे काही काळात ते कठडे पुन्हा पडले या रहदारीच्या रस्त्यावरील तुटलेल्या कठड्याचे काम का होत नाही? का या गोष्टीकडे सार्वजनीक बांधकाम विभाग जाणून बुजून अशा गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्यास निदर्शनास आल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. तर गेली 5/6 वर्षे झाली पण ह्या कठड्याची दुरुस्ती न केल्याने या ठिकाणी अनेक निरपराध प्राण गेले असते.या कठड्यावरुन महेंद्रा, कमांडर,जीप,सहा सिटर रिक्षा,पॅगो रिक्षा व मारुती ओमनी खाली पडल्याची अशी अनेक घटनाच नव्हे तर   मालिकाच सुरु असल्याची माहिती नागरीकांकडून समोर येत आहे तर काही शाळकरी मुले - मुली रस्ता अरुंद असल्याने या तुटक्या कठाड्यामुळे प्रवास करत असताना सायकलीसह नाल्यात पडल्याची वारंवार घटना घडत आहे.याबाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी गांभीर्याने लक्ष घालून पुलाच्या कठड्याची दुरुस्ती केली नाही तर होणाऱ्या पुढील परीणामास सर्वस्वी सा.बा.विभाग प्रकल्प पुणे जबाबदार राहील अशी प्रखर प्रतिक्रिया नागरीकांकडून उमटत आहेत.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News