आतंरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजप व स्मित सेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबीर


आतंरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजप व स्मित सेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबीर

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर ससानेनगर परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिर  आयोजित करण्यात आले होते

यावेळी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे  2014 पासून पूर्ण जगभरात योगा दिन साजरा होत आहे.

योग ही भारताने जगाला दिलेली संजीवनी आहे. योग हे निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे, नियमित योग केल्याने आपली प्रतिकार शक्ती वाढून आयुष्य तणावमुक्त होऊन उत्साह निर्माण होतो असे स्मितसेवा फौंडेशन अध्यक्षा व भारतीय जनता पार्टी पुणे शहर ओबीसी मोर्चा उपाध्यक्षा सौ स्मिता ताई गायकवाड यांनी सांगितले.

योग प्रशिक्षक सौ सुनीता शेंगदाणे यांनी खूप छान योगा घेतला. यावेळी सौ. संगीता पाटील, सौ सुजाता गायकवाड, सौ सुनीता  पाटील, सौ. सोनाली ओव्हाळ, सौ नूतन पासलकर, सौ झेंडे ताई, सौ अपर्णा बाजारमठ, सौ संगिता बोराटे, सौ आरती कांबळे, सौ. विजया भूमकर, सौ. अनिता हिंगणे, श्रीमती सरस्वती डांगमाळी, कु. नेहा निंगले या मान्यवर महिला उपस्थित होत्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News