आपत्ती काळात प्रत्येक गावामध्ये आपत्ती प्रतिसाद कृती दल कार्यरत ठेवा – पालकमंत्री जयंत पाटील सांगलीवाडी येथे "जयंत रेस्क्यू फोर्स" ची स्थापना


आपत्ती काळात प्रत्येक गावामध्ये आपत्ती प्रतिसाद कृती दल कार्यरत ठेवा – पालकमंत्री जयंत पाटील  सांगलीवाडी येथे "जयंत रेस्क्यू फोर्स" ची स्थापना

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक, जून 20, 2021 

आपत्ती काळात प्रत्येक गावामध्ये आपत्ती प्रतिसाद कृती दल कार्यरत ठेवा –  पालकमंत्री जयंत पाटील

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : आपत्तीच्या काळात नागरिकांनी सहकार्य करावे सांगलीकरांच्या कोणत्याही संकटाच्या वेळी आम्ही सदैव धावून येऊ त्या दृष्टिकोनातून हरिदास पाटील यांनी तरुण मराठा बोट क्लब, सांगलीवाडी यांच्यामार्फत आज जयंत रेस्क्यू टीम उभी केले हे कौतुकास्पद आहे, आपत्ती काळत प्रत्येक गावामध्ये आपत्ती प्रतिसाद कृती दल कार्यरत ठेवावे असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

तरुण मराठा बोट क्लब, सांगलीवाडी यांच्यामार्फत शंकरघाट, सांगलीवाडी येथे जयंत रेस्क्यू फोर्सचे उद्घाटन व फायबर बोटी प्रदान सोहळ्याच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त नितिन कापडनीस, हरिदास पाटील, सुरेश पाटील, मैनुदिन बागवान हे उपस्थित होते.

यावेळी मंत्री जयंत पाटील म्हणाले, पावसाळ्याची सुरुवात चांगली झाली आहे, कोल्हापूर जिल्ह्यातही  चांगला पाऊस पडला आहे. तसेच धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाला आहे. पुराची पातळी मर्यादेत ठेवणे आणि मर्यादेपेक्षा जास्त पाऊस झाला तर कोणत्या उपाययोजना करता येतील, कोणते क्षेत्र पाण्याखाली जाईल. नदीची पातळी आयर्विन पुलाजवळ किती झाल्यावर कोणता भाग पाण्याखाली जातो याची व्यवस्थित माहिती असलेली अत्यंत सुंदर आणि उदबोधक पावसाळा 2021 आपत्ती व्यवस्थापन कार्यप्रणाली ही पुस्तिका महानगरपालिकेने काढली आहे. त्याबद्दल त्यांचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी अभिनंदन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News