पारधी समाजाला हक्काचे घरकुल न मागता सन्मानाने ध्यावे


पारधी समाजाला हक्काचे घरकुल न मागता सन्मानाने ध्यावे

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी :जळगाव(बारामती)

शेवराई सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून आयोजित सामाजिक कार्यक्रम जळगाव सुपे ता.बारामती येथे गेली 70 वर्षांपासून कठीण परिस्थितीत फाटक्ये पालात रहाणारे कुटुंब ,समाजसेवक ,लेखक आणि पारधी समाजाचा देवमाणूस नामदेव भोसले  यांच्या सहकार्याने पत्र्याच्या शेड मध्ये 1 महिन्याच्या आत घरात राहायला गेले हा आनंद उत्सव दि 19 जुन 21 रोजी दुपारी 2 वाजता साजरा करीत असताना वरून राजाने दमदार स्वागत केले. याचे साक्षीदार फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन चे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक,अंध मुलाचे  सर्व प्रकारे सेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते दिलीप शेलवंटे,पुणे व  भिगवण चे सामाजिक कार्यकर्ते डॉ.सुमित कटकसाळे आवर्जून उपस्थित होते.

यावेळी वरूण राजा बरसत असताना  त्यांचे आजवरचे पालातील  अनेक पुरुष व महिला मंडळीचे  कटू  प्रसंग ऐकून या कुटूंबानी कसे दिवस काढले हे वास्तव जाणून  सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की असे  कटू अनुभव भारत स्वतंत्र होऊनही हा पारधी समाज विना तक्रार आज पर्यंत सहन करीत आला आहे. याची दखल व जाणीव गावकरीमंडळी  , राज्यकर्ते शासन का घेत नाहीत याचे आश्चर्य व्यक्त केले.फहक्त शासन नावाला जीआर काडते का  , त्या जीआर नुसार खरेच  मदत  करते  का याची पडताळणी खालपासून ते वर पर्यंत का कोणीच करीत नाहीत. पुढे ढोक म्हणाले की आपली ही माणस नाहीत का, खरे तर देश स्वतंत्र होण्यासाठी आदिवासी. मागास.समाजाने खूप मदत केली म्हणूनच  व अन्य गोष्टीमुळे संविधानात काही तरतुदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली परंतु आजदेखील ती आमलात येतं नाहीत. त्यांना सर्वांनीच  सन्मानाने जगू देण्याचे काळाची गरज आहे. निवडणूकीच्या वेळी त्यांची मते हवेत तर त्यांना हक्काचे सोयी सुविधा देताना आजही कचुराई का करतात .शासन जीआर नुसार 

ज्या ज्या गावात आदिवासी पारधी ,भिल्ल व  समाज  गावाचे बाहेर पाल ठोकून वर्षानुवर्षे रहात आहेत अशा *कुटुंबातील लोकांना शासन नियमाने जागा , घरकुल भारतीय म्हणून सन्मानाने द्यावेत* असे घटणेत तरतूत आहे हा समाज अजूनही अशिक्षित असल्यामुळे त्यांना हक्काची जाणीव नाही यासाठी नामदेव भोसले देवमाणुस अहोरात्रन दिवस मदत करीत आहे असे कार्यकर्ते शिक्षण घेऊन तयार झाले पाहिजेत त्यासाठी पालकांनी कुटुंब नियोजन करून एक ,दो ,वरच मुलांचे नीट संगोपन करून त्यांना चांगले शिक्षण द्या तरच समाज या दलदलीतून बाहेर येईल असंही ढोक म्हणाले.

यावेळी डॉ सुमित खटकाळे.प्रभाकर व दिलीप शेळवंटे देखील म्हणाले की  आपल्या पाल्याना चांगले शिक्षण द्या त्याना आपल्या घरगुती कामात व बालमजूर म्हणून वापरू नका,काही  मुले कमी शिकले तरी त्यांना चांगला रोजगार मिळेल असे कोर्सेस चे शिक्षण देऊन आपल्या समाजावर चोर,संशयित चोर  व इतर डाग पुसून टाकून मेहनतीने पुढे या असा मौलिक सल्ला पण दिला.

यावेळी डॉ .सुमित याचा केक कापून वाढदिवस साजरा करून निसर्गाचे व पर्यावरणाचे  पुजक आम्हीच आहोत म्हणून   विविध प्रकारचे झाडे लावली, त्यानंतरही वरून राजाने बरसात करीत या आनंद सोहळ्यात सहभाग घेतला म्हणून व  पत्र्याचे शेड मध्ये हा सुखद आनंद सर्वजण घेत होते  आणि पुढील वेळेस येईपर्यंत पक्के घरे सर्वांची तयार होवोत , *हक्काचे घरकुल सन्मानाने  मिळो* ही आशा सर्व मान्यवरांनी व्यक्त करीत या मुलांच्या शिक्षणासाठी सर्वोत्तपरी मदत करू असे  आस्वासन दिले तर सर्व महिलांना साड्या धान्य बाजारचे किट व मुलाना खाऊ वाटप  तसेच ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले,महात्मा फुले गीत चरीत्र ,थोर ऐतिहासिक शूर महिला ग्रंथ भेट देऊन  महापुरुषांचे कार्य वाचून मोठे व्हा असा आशीर्वाद देखील सर्वांनीच दिला.या वेळी गरीब पिडीत लोकाच्या दुःखात  कांम करणारे नामदेव भोसले व त्यांच्या या कामात अहोरात्र सहकार्य करणा-या त्यांच्या पत्नी गौरी नामदेव भोसले ह्यांचा एकत्रित सन्मान करून वातावरण हश्यमय केले. त्यानंतर मान्यवरांनी त्यांचे सोबतच आपल्यातील म्हणून भोजन देखील केले.

या कार्यक्रमाचे स्वागत ,प्रास्तविक व सूत्रसंचालन , संत तुकारामाचे कार्य सांगत व मध्येच पूरक कवीता म्हणत लेखक नामदेव भोसले यांनी कार्यक्रमास रंगत आणली. तर या वेळी सुरज वाबळे,उकलराव भोसले ,  शरद भोसले,बलवार पवार,कुणाल भोसले,सचिन राऊत, स्वप्रित भोसले,पत्रकार ज्ञानेस्वैर जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले तर शेवटी आकाश ढोक यांनी आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News