ब्रिटीशकालीन जुना रेल्वे पूल ते डिकसळ या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न.... प्रा. रामदास झोळ यांच्या पाठपुराव्याला यश.


ब्रिटीशकालीन जुना रेल्वे पूल ते डिकसळ या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न.... प्रा. रामदास झोळ यांच्या पाठपुराव्याला यश.

भिगवण (प्रतिनिधी):  नानासाहेब मारकड 

कोंढार चिंचोली (ता.करमाळा) येथील भीमा नदी वरील ब्रिटिशकालीन जुना रेल्वे पूल ते डिकसळ(ता इंदापूर) या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन राज्यमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाले, या रस्त्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

     सदर कार्यक्रमाला बारामती ॲग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप गारटकर ,दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ, बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष  गुळवे, जि.प.सदस्या सवितादेवी राजेभोसले, पं.स. सदस्या मंदाकिनी लकडे, जिल्हा परीषद सदस्य हनुमंत बंडगर , तालुका उपाध्यक्ष धनंजय थोरात कोषाध्यक्ष सचिन बोगावत , अजिंक्य माडगे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे आदी मान्यवर उपस्थित होते.

      या रस्त्यासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांनी वारंवार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी करुन पाठपुरावा केला होता.तसा उल्लेख राज्यमंत्री  भरणे यांनी  यावेळी मनोगतात केला. प्रा.रामदास झोळ  हे सतत या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करत होते तसेच बारामती ॲग्रो चे अध्यक्ष राजेंद्र  पवार यांनी देखील या पुलाची  मागणी केली होती ,करमाळा तालुक्यातील सर्वच पक्षाच्या नेतेमंडळींनी ब्रिटिशकालीन जुना रेल्वे पूलाच्या रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी केली होती त्याला यश आले आहे.

       सदर रस्त्याचे काम जलदगतीने चालु करुन, काम हे उत्कृष्ट दर्जाचे झाले पाहिजे अशा सुचना बारामती ॲग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी संबंधित कामाच्या ठेकेदार यांना यावेळी दिल्या.

      सदर  रस्त्याच्या कामामुळे सोलापूर व पुणे जिल्ह्यातील दळणवळणाची चांगली सोय होणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News