भिगवण : ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत विकासात भर घालणारी - ना.दत्तात्रय भरणे


भिगवण : ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत विकासात भर घालणारी - ना.दत्तात्रय भरणे

भिगवण (प्रतिनिधी) नानासाहेब मारकड , मदनवाडी गावातील ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत विकासात भर घालणारी असुन या कार्यालयातुन गोरगरीब जनतेची कामे मार्गी लावावीत असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले 

 मदनवाडी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या उद्घघाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर  जिल्हा परिषदेचे सदस्य श्री हनुमंत बंडगर, इंदापूर तालूका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री अतुल झगडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री सचिन सपकळ,मा.पंचायत समिती सदस्य श्री तुकाराम बंडगर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री आबासाहेब देवकाते,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष धनंजय थोरात, भिगवण पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक जीवन माने ,प्रकाश ढवळे ,  सचिन बोगावत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री शुभम निंबाळकर, मदनवाडीच्या  सरपंच आम्रपाली बंडगर, उपसरपंच तेजस देवकाते,  आण्णा धावडे, नानासाहेब बंडगर, मनोज राक्षे, विष्णू देवकाते, अजिंक्य माडगे , शिवाजी देवकाते, राजाभाऊ देवकाते,हनुमंत थोरात ,कुंडलिक बंडगर, गणपत ढवळे,सतीश बंडगर, सतिश शिंगाडे,लाला कुंभार , रणजित निकम,  गुणवंत बंडगर आदी मान्यवर उपस्थित होते 

 भरणे यांनी सांगितले की ग्रामपंचायतीची नूतन इमारत ही मदनवाडीच्या वैभवात भर घालणारी असल्याचे सांगून चांगल्या पद्धतीने इमारतीचे बांधकाम झाल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले.तसेच मदनवाडी गावातील सर्व बाजूने असलेल्या रस्त्याच्या कामाचे ऑनलाईन भूमीपूजन आपल्या भागाच्या खासदार सुप्रियाताइ सुळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते आता सदर रस्त्याच्या निविदा प्रसिद्ध होवून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येइल. तसेच शेतीच्या पाण्यासाठी मी आपल्या सर्वाचा प्रतिनिधी म्हणून प्रामाणिक पणे प्रयत्न करुन शासन दरबारी वहिवाट घातली आहे.लवकरच या भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न  कायमस्वरुपी सुटणार आहे. मदनवाडी तलावाच्या दुरूस्तीसाठी पंचवीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मदनवाडी गावचा विकासाचा अनुशेष भरुन काढण्यात येइल. असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच आम्रपाली बंडगर यांनी केले तर आभार राजाभाऊ देवकाते यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News