युवक काँग्रेसच्या वतीने रुग्ण मित्र नादीर खान यांचा "खरे कोविड योद्धा" म्हणून सन्मान


युवक काँग्रेसच्या वतीने रुग्ण मित्र नादीर खान यांचा "खरे कोविड योद्धा" म्हणून सन्मान

- युवक काँग्रेस व अहमदनगर फौंडेशन ट्रस्टच्यावतीने कोविडच्या काळात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सहाय्य करणारे रुग्ण मित्र नादीर खान यांचा "खरे कोविड योद्धा" म्हणून पै.मोसिम शेख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नईम सरदार, काँग्रेसचे मुबीन शेख, अन्वर मुन्नवर सय्यद आदि. 

जीवाची पर्वा न करता रुग्णांसाठी केलेले कार्य मानवतेचे प्रतिक - पै.मोसिम शेख

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत) - सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. परंतु ज्यावेळी कोरोनाचा कहर उच्च पातळीवर झाला होता, त्यावेळी माणूस माणासापासून दूर जात होता, अशा परिस्थितीत कोरोना बाधित रुग्णांना दिलासा देऊन त्यांना उपचार मिळवून देण्यासाठी नादीरभाई यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद असेच आहे. नादीरभाईंनी कोरोना बाधित रुग्णांना जिल्हा रुग्णालयासह इतर हॉस्पिटलमध्ये स्वत: अ‍ॅडमिट करुन उपचारासाठी सहाय्य केले. सर्वसामान्य, गोर-गरीबांना उपचार मिळवून देऊन त्यांचे प्राण वाचविले. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता केलेले हे कार्य मानवतेचे प्रतिक आहे, ते खरे  "कोरोना योद्धेच" आहेत, असे प्रतिपादन  युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पै.मोसिम शेख यांनी केले.युवक काँग्रेस व अहमदनगर सोशल फौंडेशन ट्रस्टच्यावतीने कोविडच्या काळात मागील एक वर्षांपासून सतत कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सहाय्य करणारे रुग्ण मित्र नादीर खान यांचा "खरे कोविड योद्धा" म्हणून पै.मोसिम शेख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नईम सरदार, काँग्रेसचे मुबीन शेख, अन्वर मुन्नवर सय्यद आदि उपस्थित होते.

     यावेळी नादीर खान म्हणाले, रुग्णसेवा ईश्‍वर सेवा मानून आपण हे कार्य अनेक वर्षांपासून करत आहे. सध्याच्या कोरोना काळात खर्‍या अर्थांना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उपचारा बरोबरच आधार देण्याचे काम केले. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सर्वसामान्यांना वेळेत उपचार मिळणे ही भावना आहे. आज केलेल्या सन्मानामुळे काम करण्यास आणखी प्रेरणा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.


 

    

जाहिरात
Search
विडिओ
Recent News